घरात भाजी नाही काय करावे समजत नाही करा चमचमीत पापडाची भाजी
Chamchmit Papad Bhaji | Papadachi Bhaji Recipe In Marathi
काही वेळेस घरात भाजी नसते व भाजी असली तर कोणती भाजी निराळ्या प्रकारे भाजी बनवावी ते समजत नाही. प्रतेक घरात उडीद किंवा मुगडाळीचे पापड असतातच मग अश्या वेळी पापडा पासून भाजी बनवा.
The Chamchmit Papad Bhaji | Papadachi Bhaji In Marathi be seen on our You tube Chanel Chamchmit Papad Bhaji | Papadachi Bhaji
पापड भाजी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट होणारी आहे. तसेच ती स्वादिष्ट व चमचमीत लागते. कोणी पाहुणे येणार असतील तर आपण अश्या प्रकारची निराळी भाजी बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
4 पापड उडीद किंवा मुगाचे
1 मध्यम आकाराचा कांदा
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1 वाटी दही
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून कसूरी मेथी
कोथिंबीर चिरून
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
कृती: प्रथम पापड नॉनस्टिक तव्यावर कापडानी दाबून दाबून भाजून घ्या, किंवा मायक्रोवेव्ह् मध्ये भाजून घेऊन बाजूला ठेवा. मग त्याचे मोठे तुकडे करून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या, आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. एका बाउलमध्ये दही फेटून घ्या.
एक पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे व हिंग घालून चिरलेला कांदा घालून 2-3 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची 1 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला घालून 30 सेकंड गरम करून घ्या, मग त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून थोडेसे गरम झालेकी त्यामध्ये कसूरी मेथी व फेटलेले दही घाला. आता त्याला एक उकळी येऊ द्या. मंद विस्तवावर हलवत रहा म्हणजे दही फुटणार नाही.
आता त्यामध्ये पापडाचे तुकडे घालून हळुवार पणे मिक्स करा साधरणे पणे एक ते दीड मिनिट गरम होऊ द्या मग लगेच विस्तव बंद करा.
आता गरम गरम पापडची भाजी चपाती बरोबर सर्व्ह करा.