2 मिनिटात चटपटी मसाला कैरी मुलांसाठी तोंडात टाकताच चव आणणारी वर्षभरासाठी
In 2 Minutes Street Style Chatpati Masala Kairi Recipe In Marathi
आता उन्हाळा चालू आहे आपल्याला बाजारात जीकडे तिकडे कैऱ्या पाहायला मिळतात. आपण कैऱ्याचे लोणचे, पन्हे किंवा सरबत बनवतो. आज आपण कैरी पासून मसाला कैरी बनवणार आहोत. मसाला कैरी बनवायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे.
मसाला कैरी जेवण झाल्यावर मुखवास म्हणून सुद्धा सेवन करू शकतो. त्यामुळे तोंडाला छान चव येते. आपण शाळेत जात होतो तेव्हा शाळेच्या गेटच्या दारात आजी किंवा आजोबा चिंचा, आवळे मसाला कैरी गोळ्या घेऊन बसायचे ते खाण्याची मज्जाच वेगळी होती.
The In 2 Minutes Street Style Chatpati Masala Kairi Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Chatpati Masala Kairi
चटपटी मसाला कैरी बनवताना त्यामध्ये जिरे, मिरे, लाल मिरची पावडर, काळे मीठ व पिठीसाखर वापरली आहे त्यामुळे आंबट-गोड-तिखट अशी त्याची चव लागते.
साहित्य:
4 कैऱ्या
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून जिरे पावडर
1 टी स्पून मिरे पावडर
1 टी स्पून काळे मीठ
1 1/2 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून मीठ
3 टे स्पून पिठीसाखर
कृती: कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेऊन त्याची साल काढा. आता कैरीच्या उभ्या पातळ स्ट्रिपस कापून घ्या आपण जसे बटाट्याचे फ्रेंच फ्राइज करतो तसे.
आता सर्व स्ट्रिपस एका मोठ्या आकाराचे बाउलमध्ये किंवा परातीत घेऊन त्यावर हळद, जिरे पावडर, मिरे पावडर, काळे मीठ, काश्मिरी लाल मिरची पावडर, मीठ व पिठीसाखर घालून हळुवार पणे मिक्स करा मसाला प्रतेक स्ट्रिपस ला लागला पाहिजे.
आता दोन मोठी स्टीलची ताट घेऊन प्रतेक स्ट्रिप ताटात वेगवेगळी ठेवा म्हणजे सुट्टी सुट्टी ठेवा. म्हणजे ती छान सुकेल. कैरीच्या स्ट्रिपस उन्हात 2 दिवस ठेवा म्हणजे त्या चांगल्या सुकतील मग काचेच्या बरणीत भरून ठेवा पाहिजे तेव्हा खा खूप छान लागतात तोंडाला छान चव येते.