असा मस्त कुरकुरीत नाश्ता बनवला पाहुण्यांना खूप आवडला मग परत बनवला तो सुद्धा संपला
Tasty Crispy Nashta For Guests Different Style Recipe In Marathi
आपल्या कडे पाहुणे येणार असतील तर आपण काहीतरी निराळी डिश बनवतो. आपल्याला वाटते की आपण निराळी डिश बनवली तर सगळे आवडीने खातील. त्यासाठी आपण आज अशीच एक मस्त डिश बनवणार आहोत. त्यासाठी सारण सुद्धा अगदी निराळे आहे त्यामध्ये कांदा लसूण वापरला नाही. तरी सुद्धा त्याची टेस्ट छान लागते.
The Tasty Crispy Nashta For Guests Different Style Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Tasty Crispy Nashta For Guests
आपण त्याचा आकार सुद्धा छान बनतो. मस्त कुरकुरीत हा नाश्ता बनतो. तसेच त्याच्या पासून कापलेल्या पटींची कुरकुरीत शंकरपाळी सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 9 बनतात
साहित्य:
आवरणासाठी:
1 कप मैदा
1 टी स्पून ओवा
1 टे स्पून तेल
मीठ चवीने
सारणासाठी:
2 बटाटे उकडून सोलून
1/4 कप हिरवे ताजे मटार
1 टे स्पून तेल
1 टी स्पून प्रतेकी मोहरी,जिरे,बडीशेप,कलोंनजी, मेथ्या
1/4 टी स्पून हिंग
1 टे स्पून हिरवी मिरची व आले (कुटून)
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/2 टी स्पून चाट मसाला
1 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
साहित्य साट्यासाठी
1 टे स्पून तूप
1 टे स्पून मैदा
तळण्यासाठी तेल
कृती: बटाटे उकडून सोलून बाजूला ठेवा. हिरवे ताजे मटार वाफवून घ्या.
आल-हिरवी मिरची कुटून घ्या.
आवरणासाठी: एका बाउलमध्ये मैदा, ओवा, मीठ व तेल घालून मिक्स करून पाणी वापरुन पीठ चांगले मळून घेऊन बाजूला ठेवा.
सारणासाठी: एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, बडीशेप, कलोनजि व मेथ्या घालून थोडे गरम करून हिंग घालून आल-हिरवी मिरची घालून काही सेकंद गरम करून त्यामध्ये मटार घालून थोडेसे पाणी घालून गरम करून त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, चाट मसाला व मीठ घालून उकडलेले बटाटे कुस्करून घाला वरतून कोथिंबीर घालून मिक्स करून भाजी चांगली परतून घ्या.
नाश्ता बनवण्यासाठी: मळलेल्या पिठाचे एकसारखे 4 गोळे बनवून पुरी सारखे लाटून घ्या. एका छोट्या बाउलमध्ये तूप व मैदा घेऊन थोडे फेटून घ्या. एक पुरी घेऊन त्यावर तुपाचे थोडे साटा लावून एक सारखे पसरवून घ्या. त्यावर दुसरी पुरी ठेवून त्यावर साटा लावून त्यावर तिसरी पुरी ठेवा त्याला सुद्धा साटा लावा मग त्यावर चौथी पुरी ठेवून हातांनी हळुवार पणे दाबून चपाती सारखी मोठी चपाती लाटून घ्या. मग चारी बाजूनी सूरीनी कट करून चपाटीला चौकोनी आकार द्या. कडा कापलेल्या बाजूला ठेवा. मग चौकोनाचे एक सारखे 9 चौकोन कापून घ्या. प्रतेक चौकोना मध्ये बनवलेले सारण ठेवा.
आता एका वाटीत मैदा घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालून एक थोडा घट्ट घोळ बनवून घ्या. मग प्रतीक चौकोनाला बाजूनी थोडासा ब्रशनी घोळ लावून घ्या. मग चौकोनाचे दोन विरुद्ध कोन जोडून घ्या. दुसरे विरुद्ध कोन जोडून घ्या. मग बाजू हातांनी हळुवार दाबून घेऊन त्याला आकार द्या. अश्या प्रकारे सर्व चौकोनाला आकार द्या.
आपण कापलेल्या कडा घेऊन त्याचे अजून थोडे मध्यम आकाराचे तुकडे कापून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बनवलेला नाश्ता छान कुरकुरीत तळून घ्या. नाश्ता तळून झाल्यावर शंकरपाळे तळून घ्या.
गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.