Swadisht Zatpat Chicken Momos Street Food Style Recipe In Marathi
2 दिवसांपूर्वी मस्त चिकन मोमोज बनवले अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात मुले आता सारखी म्हणतात चिकन मोमोज पाहिजे
मुलांना रोज संध्याकाळी वेगवेगळळे पदार्थ खायला आवडतात. आता शाळा चालू झाल्या आहेत तर रोज संध्याकाळी आल्यावर त्यांच्या आवडतीचे खायला करायला लागते. तसेच ते पौष्टिक सुद्धा पाहिजे.
The Swadisht Zatpat Chicken Momos Street Food Style Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Swadisht Zatpat Chicken Momos Street Food Style
आज आपण मुलांचे आवडतीचे मोमोज कसे बनवायचे ते पाहणार आहोत. आपण चिकन मोमोज बनवणार आहोत. चिकन मोमोज अगदी सोप्या पद्धतीने तसेच स्वादिष्ट व झटपट कसे बनवायचे ते पाहू या.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 15 बनतात
साहित्य आवरणासाठी:
1 कप मैदा
1 टे स्पून तेल
मीठ चवीने
सारणाकरिता:
250 ग्राम बोनलेस चिकन किंवा खीमा
1 मध्यम आकाराचा कांदा
10-12 लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
1” आले (बारीक चिरून)
3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
1/4 कप कोथिंबीर (चिरून)
1 टी स्पून व्हेनिगर
1 टी स्पून सोया सॉस
1/2 टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
कृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये मैदा, मीठ व तेल मिक्स करून घेऊन थोडेसे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ फार सैल किंवा घट्ट नको आपण जसे चपाती साठी कणिक मळतो तसे मळावे व झाकून 30 मिनिट बाजूला ठेवावे.
सारणासाठी: चिकन खीमा घ्या किंवा बोनलेस चिकन घेऊन मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेवू शकता. कांदा, आल-लसूण-हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
एका बाउल मध्ये खीमा किंवा बोनेलेस चिकन ब्लेंड केलेले घेऊन त्यामध्ये चिरलेला कांदा, आल-लसूण-हिरवी मिरची व कोथिंबीर घाला, व्हेनिगर, मिरे पावडर, सोया सॉस, तेल किंवा बटर व मीठ चवीने घालून मिक्स करून घ्या.
मोमोज बनवण्यासाठी: मळलेल्या पिठाचे दोन भाग करून एक भाग चपाती सारखा मोठा लाटून घ्या. मग एका डब्याचे झाकण घेऊन त्याने पोळीचे छोटे छोटे गोल पुरी सारखी कापून घ्या. मग कडेची राहिलेली पोळी काढून घ्या.
आता एक छोटी पुरी घेऊन परत थोडी पातळ लाटून घ्या मग त्यामध्ये बसेल तेव्हडे चिकनचे सारण ठेवून पुरी मुडपून त्याला मोदका सारखा आकार द्या किंवा बाहेर जसे मोमोज मिळतात तसा आकार द्या.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा त्याच्या आकाराची चाळणी घेऊन त्याला आतून थोडेसे तेल लाऊन त्या चाळणी मध्ये जेव्हडे मोमोज बसतील तेव्हडे ठेवा मग झाकण ठेवून 12-15 मिनिट स्टीम द्या. आपण मोदक पत्रामध्ये सुद्धा मोमोजला स्टीम देवू शकता.
मोमोजला स्टीम देवून झाल्यावर गरम गरम चटणी बरोबर सर्व्ह करा.