Soft Delicious Kharvas Bina Chikachya Dudhacha Gul Ghalun Recipe In Marathi
खरवस बिना चिकाच्या दुधाचा घरगुती समान दूध व गुळ वापरून बनवा घट्टसर खरवस वडी
खरवस म्हटले की आपल्या डोळ्या समोर छान मऊ स्वादिष्ट वड्या डोळ्या समोर येतात. खरवसच्या वड्या बनवण्यासाठी चिकाचे दूध लागते. पण शहरी भागामध्ये गाईचा किंवा म्हशीचा चिक मिळेलच असे नाही. चिका पासुन खरवस बनवतात व तो स्वादिष्ट लागतो. खरवस बनवताना त्यामध्ये गुळ वापरला आहे त्यामुळे तो पौष्टिक आहे. गुळ शक्यतो ऑर्ग्यानीक वापरा.
The Soft Delicious Kharvas Bina Chikachya Dudhacha Gul Ghalun Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Soft Delicious Kharvas Bina Chikachya Dudhacha Gul Ghalun
आपल्याला खरवस वड्या खाव्याश्या वाटत आहेत पण आपल्या कडे चिकाचे दूध नाही. आपण बाजारात गेल्यावर पहात असाल की गाडीवर पण आपल्याला खरवसच्या वड्या अगदी मोठ्या मोठ्या आकाराच्या बघायला मिळतात तुम्हाला काय वाटते की ते चिकाचे दूध वापरुन खरवस बनवतात नाही. ते कोणती पद्धत वापरतात ते आज आपण पहाणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाफवण्यासाठी वेळ: 18-20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 कप दूध (फूल क्रीम)
1/2 कप गुळ (बारीक चिरून)
1/2 कप कॉर्नफ्लोर
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ
1 टी स्पून तूप
कृती: फूल क्रीम दूध गरम करून थंड करून घ्या, गुळ बारीक चिरून घ्या. आपल्याला ज्या भांड्यात खरवस बनवायचा आहे त्या भांड्याला आतून तूप लावून घ्या. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये एक चाकी ठेवा.
एका भांड्यात दूध घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर घालून मिक्स करून घ्या, गुठळी राहता कामा नये. मग चिरलेला गुळ घालून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये 3/4 टी स्पून वेलची पावडर मिक्स करून घ्या, व मिश्रण गाळून घ्या. आता गाळलेले मिश्रण तूप लावलेल्या भांड्यात काढून घेऊन वरतून वेलची पावडर व जायफळ पावडर घाला.
भांड्यातील पाणी गरम झाले असेल तर मिश्रणाचे भांडे गरम झालेल्या भांड्यात ठेवा. वरतून झाकण ठेवून 18-20 मिनिट स्टीम द्या. त्या नंतर विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून खरवस थंड होऊ द्या.
खरवस थंड झाल्यावर त्याचा छान वड्या कापून सर्व्ह करा.