हाई प्रोटीन व हाय फायबर मूंगलेट हेल्दी स्नॅक्स मुलांचा डब्बा-नाश्तासाठी
High Protein High Fiber Moonglet Healthy Snacks For Kids Nasta-Tiffin Recipe In Marathi
मुंगलेट हा एक नाश्तासाठी पदार्थ आहे. मुंगलेट मुगाच्या डाळी पासून बनवले जाते. मुगडाळी मध्ये हाय प्रोटिन व हाय फायबर आहे. मुंगलेट हेल्दी स्नॅक्स आहे. आता मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत तर त्यांना डब्यात द्यायला किंवा नाश्तासाठी बनवायला छान आहे.
The High Protein High Fiber Moonglet Healthy Snacks For Kids Nasta-Tiffin Recipe In Marathican be seen on our You tube Chanel High Protein High Fiber Moonglet Healthy Snacks For Kids
मुंगलेट बनवायला अगदी सोपे आहे व झटपट होणारे आहे तसेच मुले किंवा मोठी माणसे सुद्धा आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
1 वाटी मुगाची डाळ
1 टे स्पून उडीद डाळ
1 छोटासा कांदा (बारीक चिरून)
1 छोटेसे गाजर (उभे पातळ स्ट्रिपस कापून)
1 छोटीसी शिमला मिरची (बारीक चिरून)
1 छोटेसे बीटरूट (उभे पातळ स्ट्रिपस कापून)
2 हिरव्या मिरच्या (ठेचून)
1” आले (ठेचून)
2 टे स्पून कोथिंबीर ( चिरून)
1/4 टी स्पून हळद
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
1 टी स्पून इनो फ्रूटसॅल्ट
2 टे स्पून बटर किंवा तेल
कृती: प्रथम मुगडाळ व उडीदडाळ स्वच्छ धुवून 2 तास पाण्यात भिजत घाला. कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर चिरून घ्या, गाजर व बीटरूट धुवून त्याचे उभे पातळ काप करून घ्या. आल-हिरवी मिरची कुटून घ्या.
मग पाणी काढून मिक्सरच्या जार मध्ये घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ब्लेंड करून घ्या. ब्लेंड करताना आल-हिरवी मिरची घालून ब्लेंड केले तरी चालेल.
आता वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या, त्यामध्ये चिरलेला कांदा, शिमला मिरची, निम्मे चिरलेले गाजर घालून मिक्स करून घ्या, मग त्यामध्ये मीठ, हळद, हिंग घालून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा घालून त्यावर 1 चमचा पाणी घालून मिक्स करून घ्या.
पॅनला बटर किंवा तेल लाऊन घ्या, मग त्यावर मिश्रण घालून थोडे पसरवून घ्या, आता वरतून गाजर, बीटरूट, कोथिंबीर व लाल मिरची पावडर घालून सजवून 5-7 मिनिट मंद विस्तवावर बेक करून घ्या. मग उलट करून परत थोडेसे तेल किंवा बटर घालून दुसऱ्या बाजूनी सुद्धा बेक करून घ्या.
आता गरम गरम मुगलेट सर्व्ह करा.