In 5 Minutes Zatpat Without Gas, Sugar, Mawa Instant Barfi Halwai Style Recipe In Marathi
5 मिनिटात झटपट बिना गॅस, साखर,मावा इन्स्टंट बर्फी एकदा करून पहा नक्की आवडेल
आपण 5 मिनिटात बिना गॅस बिना मावा व बिना साखर बर्फी बनवू शकतो. ते सुद्धा अगदी हेल्दी गुळ वापरुन. इन्स्टंट बर्फी ही बनवायला अगदी सोपी या झटपट होणारी आहे.
The In 5 Minutes Zatpat Without Gas, Sugar, Mawa Instant Barfi Halwai Style Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel In 5 Minutes Instant Barfi
इन्स्टंट बर्फी बनवण्यासाठी फुटाण्याची डाळ म्हणजेच भाजकी डाळ त्यालाच पंढरपुरी डाळ असे सुद्धा म्हणतात. ही डाळ आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होते. तसेच ही डाळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गुळ सुद्धा आरोग्यदायी आहे. आपण इन्स्टंट बर्फी कोणी पाहुणे येणार असतील तर झटपट बनवू शकतो किंवा इतर वेळी सुद्धा डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो.
साहित्य:
1 कप भाजकी डाळ (फुटणाडाळ)
1/2 कप गुळ
2 टे स्पून तूप
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर
3 टे स्पून काजू बदाम (तुकडे करून)
कृती: भाजकी डाळ निवडून घ्या. गुळ बारीक चिरून घ्या, ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्या, जायफळ किसून घ्या. एका प्लॅस्टिक डब्याच्या आत खालच्या बाजूला बटर पेपर ठेवा किंवा खोलगट ट्रे घेतला तरी चालेल. मग त्या पेपरवर थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे व गुलाबाच्या पाकळ्या पसरवून घ्या.
एका मिक्सरच्या जार मध्ये भाजकी डाळ घेऊन त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट घालून ब्लेंड करून घ्या, मग त्यामध्ये चिरलेला गुळ, वेलची पावडर, जायफळ पावडर व तूप घालून एकदा ब्लेंड करून घ्या.
मग मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. जर मिश्रण जास्त कोरडे वाटले तर परत थोडे तूप पातळ करून घाला किंवा 2 टे स्पून दूध घातले तरी चालेल. मग चांगले मिक्स करून घेवून मिश्रण बटर पेपर लावलेल्या डब्यात घालून चमच्याच्या सहायानी एक सारखे करून घ्या. मग त्यावर झाकण ठेवून एक तास बाजूला ठेवा म्हणजे ते छान सेट होईल.
आता एक तास झाला की झाकण काढून ट्रे मधील मिश्रणाच्या बाजूनी हळुवार पणे सुरिणी मिश्रण मोकळे करून घ्या. मग एका प्लेटमध्ये डब्बा उलट करून घ्या व बटर पेपर हळुवार पणे काढा. आता त्याचे एकसारखे तुकडे कापून घ्या. मग डब्यात भरून ठेवा, लागेल तेव्हा सर्व्ह करा.