Dal-Kobichi Chi Bhaji Mulanchya Dabyasathi | Chandal-Cabbage Bhaji Recipe In Marathi
10 मिनिटांत डाळ-कोबी भाजी मुलांची आवडती डब्यासाठी 1 चपाती आयवजी 2 चपाती खातील
कोबीची भाजी सर्वाना आवडते. मुलांना डब्यात द्यायला पण मस्त आहे मुले अगदी आवडीने खातात. कोबीची हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. कोबीची भाजी पचायला हलकी असते व बनवायला सोपी व झटपट होणारी आहे.
The Dal-Kobichi Chi Bhaji Mulanchya Dabyasathi | Chanadal-Cabbage Bhaji Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Dal-Kobichi Chi Bhaji Mulanchya Dabyasathi | Chanadal-Cabbage Bhaji
आज आपण कोबीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. चनाडाळ वापरुन आपण ही भाजी बनवणार आहोत.
साहित्य:
2 कप कोबी (उभा पातळ चिरून)
2 टे स्पून चनाडाळ
1 टी स्पून साखर
1 टे स्पून ओले खोबरे
1 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
2 हिरव्या मिरच्या (उभ्या चिरून)
1/4 टी स्पून हळद
कृती: प्रथम चनाडाळ 2 तास पाण्यात भिजत ठेवा. कोबी धुवून उभा पातळ चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता पाने व हिरवी मिरची घालून थोडीशी गरम करून घ्या, मग त्यामध्ये भिजवलेली चनाडाळ, हळद व मीठ घालून मिक्स करून थोड गरम करून घ्या.
आता चिरलेला कोबी घालून मिक्स करून कढई वर झाकण ठेवून झकणावर पाणी घालून 5-7 मिनिट भाजी शिजवून घ्या, मधून मधून झाकण काढून भाजी हलवून घ्या.
कोबीची भाजी लवकर शिजते त्यामुळे 5-7 मिनिट झाल्यावर झाकण काढून त्यामध्ये ओला नारळ, कोथिंबीर व साखर घालून मिक्स करून घ्या.
गरम गरम कोबीची भाजी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.