पितृपक्ष श्राद्ध पक्षमध्ये कोणते उपाय करावे कोठे दिवा लावावा पित्र भरभरून आशीर्वाद देतील
Pitru Paksha Shradh Paksha 2024 Upay Dewa Kuthe Lavava In Marathi
हिंदू धर्मा मध्ये पितृ पक्षला खूप महत्व आहे. ह्या वर्षी 18 सप्टेंबर 2024 पासून पितृपक्ष सुरुवात झाली असून 2 ऑक्टोबर पर्यन्त पितृपक्ष आहे. पितृपक्ष मध्ये पितरांना तर्पण, पिंड दान, श्राद्ध, ब्राह्मण भोजन, दान धर्म ह्याला खूप महत्व आहे. त्यामुळे पितर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात.
पितृपक्ष मध्ये आपण काही सटीक उपाय:
पितृपक्ष मध्ये आपण काही सटीक उपाय केलेतर आपल्याला आपल्या पितरांकडून आशीर्वाद मिळून आपल्याला धन-धान्यची कधी कमतरता होत नाही, आर्थिक स्थिति सुधारते, वंश वाढतो, आपल्या अडचणी दूर होतात, घरात सुख शांती नांदते.
1) पितृपक्षमध्ये आपण रोज सकाळी चांदीच्या भांड्यात किंवा तांब्याच्या लोटयात जल घेवून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पित करून 7 वेळा प्रदक्षिणा मारावी, प्रदक्षिणा मारताना पुढे दिलेला मंत्र 27 वेळ किंवा 108 वेळा म्हणावा, जर प्रदक्षिणा मारणे शक्य नसेलतर जल अर्पित करून उभे राहून मंत्र म्हणावा. मंत्र म्हणण्याच्या अगोदर आपली मनोकामना मनातल्या मनात म्हणावी नक्की लवकर पुर्ण होऊन ब्रह्मा, विष्णु व महेश ह्यांची कृपा मिळेल.
मंत्र: || ॐ सर्व पितृ मन: कामना सिद्ध कुरू कुरू स्वाहा ||
2) सकाळी हा उपाय करायला नाही जमले तर संध्याकाळी आपल्या घरातील तुळशी समोर तुपाचा दिवा लावून आपली मनोकामना बोलून पुढे दिलेला मंत्र म्हणावा. त्यामुळे आपल्याला स्वास्थ मिळते व आपल्या मनोकामना पुर्ण होतात.
मंत्र: || ॐ हरीप्रिया नम: ||
पितृपक्षमध्ये कोठे दिवा लावावा:
आपण पितृपक्षमध्ये आपल्या पितरांची कृपा मिळण्यासाठी रोज त्यांच्या नावांनी दिवा लावू शकता. दिवा आपण तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता.
अ) आपण संध्याकाळी 6 च्या नंतर आपल्या घरच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. म्हणजे दिव्याची वात दक्षिण दिशेला आहे.
ब) आपण देवघरात सुद्धा ईशान्य दिशेला लावू शकता.
क) आपण संध्याकाळी तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावू शकता.
ड) आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून आत एंट्री करताना उजव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. आपल्या घराच्या मुख्य दरवाजा मधून नकारात्मक ऊर्जा आत येते त्यामुळे पितृ पक्षमध्ये 15 दिवस रोज दिवा लावल्याने पितरांची कृपा मिळून आपल्या धन-संपत्ति मध्ये वाढ होईल, वंश वाढेल, पितृदोष मुक्ती होते, उन्नती होते. जर पितर नाराज असतील तर अश्या छोट्या छोट्या उपायांनी ते प्रसन्न होतील.
पितृपक्ष मध्ये 4 जीव ना अन्नदान केले तर आपल्याला आपल्या पितरांची कृपा मिळू शकते.
पितृपक्ष मध्ये जर आपल्या घरातील दारासमोर कोणी सुद्धा कोणत्या रूपात येवू शकते. आपण कावळा, गाय, कुत्रे, मुंग्या ह्यांना आपण अन्न देवू शकता.