2 ऑक्टोबर 2024 पितृ अमावस्या करा हे उपाय नाहीतर नाही मिळणार पितरांचा आशीर्वाद
2 October 2024 Pitru Paksha Amavasya Satik Saral Upay In Marathi
2 ऑक्टोबर ह्या दिवशी आपल्या पितरांना निरोप देण्याचा शेवटचा दिवस आहे. हिंदू लोक ह्या दिवशी आपल्या पितरांना शांती व मोक्ष देण्यासाठी तर्पण, पिंडदान करतात. तसेच त्यांना निरोप देतात. शास्त्रामध्ये त्यांना निरोप देण्यासाठी बरेच उपाय सुद्धा सांगितले आहेत.
17 सप्टेंबर पासून पितृ पक्षाची सुरवात झाली आहे तर 2 ऑक्टोबर ह्या दिवशी सर्व पितृ अमावस्या हा शेवटचा दिवस आहे. ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहिले असेलतर त्यांचे श्राद्ध कर्म शेवटच्या तिथीला करू शकता. ब्राह्मण व भुकेलेल्या अन्न देण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी हवन करण्याचे सुद्धा महत्व आहे. जे केल्याने पितृ परत आपल्या लोकात निघून जातात.
हवन केल्याने उत्पन्न होणारि अग्नि मृत पितरांना पितृ लोक मध्ये पोचवण्यास् मदत करते. जेव्हा हवन मधून अग्नि येते तेव्हा प्रार्थना केली जाते की पितरांना त्याच्या जागी पोचवा. वेद पुराणा नुसार अग्निच्या माध्यमातून मनुष्य स्वर्गा पर्यन्त पोचू शकतो. स्वर्गामध्ये पितृ चिंता मुक्त होऊन आनंदी राहतात. ज्याला मोक्ष म्हणतात. तसेच पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना सुख, समृद्धी व वैभव प्राप्त होते.
पितरांकडून मनुष्य कल्पना करतात की त्यांच्या जवळ जागेवर बसून श्रद्धा भक्ति भावांनी ने केलेले कर्म ह्यांचा स्वीकार करावा तसेच काही आपराध झाले असतील तर क्षमा करून सदैव कृपा दृष्टी ठेवावी.
पितृ पक्षचा शेवटचा दिवस पितृ अमावस्या ह्या दिवशी काही उपाय केलेतर नक्की आपल्याला यश मिळून सर्व समस्यांचे निराकरण होईल.
करियर मध्ये उन्नतीसाठी उपाय:
आपल्याला नोकरीमध्ये उन्नती होण्यासाठी किंवा नोकरी मिळण्यासाठी अडचणी येत असतील तर सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी एक स्वच्छ लिंबू आपल्या घरातील देवघरात ठेवा मग रात्री आपल्या डोक्यावरून 7 वेळा फिरवून त्याचा उतरा करून त्याचे 4 भाग करा. मग जेथे 4 रास्ते एकत्र येतात म्हणजेच चौकात चारी रस्त्यांवर चिरलेलया लिंबाचा एक एक भाग टाका. असे केल्याने लवकरच करियर मध्ये येणाऱ्या बाधा दूर होतील.
कर्ज मुक्ती उपाय:
आपण कर्जाच्या बोजानी परेशान असाल तर सर्व पितृ अमावस्याच्या संध्याकाळी घरातील ईशान्य कोना मध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना त्याची वात कलवाची लावावी किंवा लाल रंगाचा दोरा वापरावा. त्याच बरोबर तुपामध्ये केशरच्या 2-3 कड्या व थोडेसे काळे तीळ घालावे. त्यामुळे लवकरच आर्थिक स्थिति सुधारेल.
कालसर्प दोष निवारण उपाय:
सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करा म्हणजेच चांदीचे नाग-नगिनची पूजा करायची व वाहत्या पाण्यात पांढऱ्या रंगाच्या फुलां सोबत प्रवाहित करायचे.
शत्रू पासून मुक्तीचा उपाय:
सर्व पितृ अमावस्याच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या. असे आपण इतर अमावस्याच्या रात्री सुद्धा करू शकता. शत्रू कायमचा सोडून जाईल.
मनोकामना पूर्ति उपाय:
सर्व पितृ अमावस्या च्या दिवशी पितरांच्या नावांनी श्राद्ध तर्पण करा व जरूरत मंद लोकांना भोजन द्या. गाय, कुत्रे, मुंग्या ह्यांना सुद्धा भोजन द्या, गव्हाच्या पिठाच्या गोळ्या बनवून नदीतील मासे ना खायला द्या. त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होतील.