करवा चौथच्या दिवशी 21 मिनिट भद्रा आहे सौभाग्यवतींनी चुकून सुद्धा हे काम करू नये
Karwa Chauth 2024 Full Information Including Bhadra Kaal in Marathi
करवा चौथ हा सण हिंदू धर्मातील लोकांचा महत्वपुर्ण सण आहे. करवा चौथ कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या दिवशी साजरा करतात. ह्या वर्षी 20 ऑक्टोबर 2024 ह्या दिवशी करवा चौथ साजरा करायचा आहे.
करवा चौथ ह्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुषासाठी व विवाहिक जीवन सुखी जाण्यासाठी प्रार्थना करून निर्जल व्रत ठेऊन चंद्रोदय झाला की मग व्रत सोडतात.
करवा चौथ शुभ वेळ:
करवा चौथच्या दिवशी शुभ वेळ 20 ऑक्टोबरला सकाळी 5 वाजून 46 मिनिट सुरू होत असून 7 वाजून 02 मिनिट पर्यन्त आहे.
भद्रा लागण्याची वेळ:
ज्योतिष शास्त्रामध्ये भद्रा ला शुभ मानले जाते. पण असे म्हणतात की भद्रा शुभ कार्यामध्ये बाधा उत्पन्न करते. ह्या वर्षी करवा चौथ च्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर ला 21 मिनिट भद्राची सावली आहे.
करवा चौथ भद्रा सकाळी 6 वाजून 24 मिनिट पासून 6 वाजून 46 मिनिट पर्यन्त आहे. म्हणजेच 21 मिनिट आहे. करवा चौथची सुरुवात भद्रा सुरू होण्याच्या आताच सुरू होत आहे. म्हणून सूर्योदय होण्याच्या आतच स्नान करून सरगी ग्रहण करून व्रत करण्याचा संकल्प करावा.
करवा चौथ व्रत करताना ही कामे करू नका:
करवा चौथचे व्रत करताना सुहागन महिलांनी श्रृंगार करताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या वस्तुचा उपयोग करू नये. जर सुहागन महिलांनी ह्या रंगाच्या वस्तुचा उपयोग केला तर नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव वाढू शकतो.
भद्रा काळामध्ये कोणत्या सुद्धा संपत्ति किंवा व्यापार संबंधित सुरुवात करू नये. करवा चौथच्या पूजे नंतर जर श्रृंगार करण्याच्या वस्तु पैकी एखादी कोणती वस्तु राहिली तर ती इकडे तिकडे न फेकता नदीमध्ये विसर्जित करावी. ह्या दिवशी कोणत्यासुद्धा धारदार वस्तुचा उपयोग करू नये. त्याच बरोबर कोणा बरोबर सुद्धा वादविवाद करू नये किंवा अपशब्द बोलू नये. व्रत संपल्यावर मसालेदार तामसी जेवण ग्रहण करू नये.
करवा चौथच्या दिवशी कोणत्या वस्तु व रंग वापरावे:
करवा चौथच्या दिवशी काळा व पांढरा रंग वापरू नये बाकीचे कोणते सुद्धा आपल्या आवडी नुसार रंग वापरू शकता.
करवा चौथच्या दिवशी ह्या 6 वस्तु जरूर धारण कराव्या त्यामुळे सौभाग्यमध्ये वृद्धी होते व विवाहिक जीवन सुखी समाधानी होते. मेंदी, सिंदूर,, मंगळसूत्र, बांगड्या, बिंदी व जोडवी.
महिलांनी पुढे दिलेला मंत्र जाप करावा:
खर म्हणजे करवा चौथच्या पूजाच्या वेळी भद्रा नाही तरी पण जर काही महिलांना भद्राची भीती वाटत असेलतर पुढे दिलेला मंत्र जाप करावा.
धन्या दधमुखी भद्रा महामारी खरानना।
कालारात्रिर्महारुद्रा विष्टिश्च कुल पुत्रिका।
भैरवी च महाकाली असुराणां क्षयन्करी।
द्वादश्चैव तु नामानि प्रातरुत्थाय यः पठेत्।
न च व्याधिर्भवैत तस्य रोगी रोगात्प्रमुच्यते।
गृह्यः सर्वेनुकूला: स्यर्नु च विघ्रादि जायते।
ह्या मंत्राचा मंत्र जाप केल्याने भद्राची भीती कमी होते व वैवाहिक जीवनात येणाऱ्या बाधा दूर होतात.
करवा चौथ चंद्रोदय:
करवा चौथच्या दिवशी चंद्रोदय रात्री 8 च्या नंतर आहे पण प्रतेक प्रांतामध्ये रात्री वेगवेगळ्या वेळी चंद्र दर्शन होईल. चंद्रदर्शन घेऊन मग पाणी ग्रहण करून उपवास सोडावा.