वसुबारस 2024 पूजा मुहूर्त, पूजा कशी करायची, महत्व व मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत
Vasubaras 2024 Puja Muhurat, Pooja Vidhi And Importance In Marathi
वसुबारस हिंदू धर्मामध्ये विशेष रूपात साजरा करतात. ज्यामध्ये गाय व तिचा बछडा ह्यांना माताचा दर्जा दिला जातो व त्यांची पूजा केली जाते. ह्या दिवसाचे विशेष महत्व आहे कारण की दिवाळीची सुरवात ह्या दिवसा पासून सुरू होत असून पहिला दिवा वसुबारस ह्या दिवशी लावतात.
वसुबारस ह्या दिवसाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व:
वसुबारस चा अर्थ असा होतो – ‘वसु’ म्हणजे धन व ‘बारस’ म्हणजे द्वादशी होय. हा दिवशी गाय व तिचा बछडाची पूजा केली जाते. गाईला हिंदू धर्मा मध्ये विशेष महत्व आहे. जिला गौमाता म्हंटले जाते. गाय आपल्याला फक्त दूधच देत नाही तर तिचे धार्मिक महत्व खूप आहे. गाय ही समृद्धी व उन्नतीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच वसुबारस ह्या दिवशी तिची पूजा करून तिचा आशीर्वाद घेण्याची जुनी परंपरा आहे.
गाय ही फक्त आर्थिक दृष्टीने महत्वपुर्ण नसून पर्यावरण संतुलन व ग्रामीण जीवन मध्ये तिचे महत्व पुर्ण योगदान आहे. प्राचीन शास्त्रामध्ये गाईचा महिमा विसतारून सांगितला आहे.
वसुबारस 2024 मुहूर्त:
वसुबारस चा मुहूर्त दरवर्षी पंचांग नुसार असतो. वसुबारस जिला गोवत्स द्वादशी असे सुद्धा म्हणतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष द्वादशी तिथीला वसुबारस हा दिवस साजरा करायचा आहे. वसुबारस ह्या वर्षी 28 ऑक्टोबर 2024 सोमवार ह्या दिवशी आहे.
द्वादशी तिथि प्रारंभ: 28 ऑक्टोबर 2024, सकाळी 07:53 वाजून
द्वादशी तिथि समाप्त: 29 ऑक्टोबर 2024, सकाळी 10:31 पर्यन्त
28 ऑक्टोबर 2024 ला सूर्योदय पासून तिथी समाप्ती पर्यन्त पूजेची उत्तम वेळ आहे. विशेष करून सकाळी पूजा करणे चांगले आहे. ह्या दिवशी उपवास म्हणजेच व्रत केलेतर त्याचे विशेष पुण्य मिळते.
वसुबारस ह्या दिवशी गाय व तिचा बछडा ह्यांची पूजा का करायची?
वसुबारस ह्या दिवशी पूजा ज्या घरात केली जाते जेथे गाय आहे. वसुबारस ह्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील साफ-सफाई करून गाय व तिच्या बछडयाला आंघोळ घालून त्यांना सजवले जाते. त्यांना फुलांची माळ घालून विविध रंगांनी सजवले जाते. मग त्यांची पूजा केली जाते.
गाय व बछडा ला ताजे गवत व अजून खाद्य पदार्थचा भोग दाखवतात. महिला व्रत ठेवतात. गाईला प्रदक्षिणा मारतात. त्याच बरोबर आपल्या परिवारात सुख-समृद्धी व मुलांच्या दीर्घायु साठी प्रार्थना करतात. पूजा करताना मंत्र व श्लोक म्हणतात मंत्रा मध्ये गाईचा महिमा वर्णन केला आहे. तसेच परिवारात धन, धान्य, स्वास्थ्य व समृद्धीचा वास येतो.
वसुबारस पूजा घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची:
पूजा करायची जागा स्वच्छ करून घेऊन त्यावर चौरंग ठेवा. चौरंगावर वस्त्र अंथरा. उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा. मग उजव्या बाजूला थोड्याश्या अक्षता ठेवून त्यावर 2 विडयाची पाने ठेवून त्यावर परत अक्षता ठेवून गणपती म्हणून सुपारी ठेवावी. पण गणपती बाप्पाना पंचामृत व पाणी घालून मग त्यांची स्थापना करायची. मग हळद-कुंकू, अक्षता, फुल अर्पित करावे.
चौरंगाच्या मधोमध गाय व बछडा ह्यांची मूर्ती अक्षता ठेऊन स्थापित करावी पण त्याअगोदर पाणी व दुधानी अभिषेक करावा मग अक्षता ठेवून स्थापना करावी. मग हळद-कुकु, अक्षता, फुल अर्पित करावी.
डाव्या बाजूला तुपाचे निरंजन लावावे. उजव्या बाजूला घंटी ठेवावी. दिव्यांची व घंटीची सुद्धा पूजा करावी. मग मनोभावे आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. नेवेद्य म्हणून गोड पदार्थ व फळ ठेवतात. ज्यांच्या कडे गाय आहे ते गाईला पुरण पोळीचा नेवेद्य दाखवून खायला देतात.
वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी आपल्या मुलांच्या दीर्घायुषसाठी व्रत:
गोवत्स द्वादशी ह्या दिवशी महिला आपल्या मुलांसाठी स्वास्थ्य व दीर्घायुष साठी प्रार्थना करून उपवास करतात. असे म्हणतात ज्याना संतान नाही त्यांनी ह्या दिवशी गाईची पुजा अर्चा करून उपवास करावा. ह्या दिवशी महिला फक्त दिवस भरात एकदाच भोजन करतात व ह्या दिवशी शरीरीक कष्ट जास्त करण्यास मनाई असते. तसेच दुधा पासून बनवलेले पदार्थ सेवन करू नये.