धनतेरस धनत्रयोदशी 2024 शुभ मुहूर्त, पूजा मांडणी, महत्व व लक्ष्मी प्राप्ती सटीक मंत्र
Dhantrayodashi 2024 Shubh Muhurat, Puja Vidhi,Mahatva W Lakshmi Prapti Mantra In Marathi
धनत्रयोदशी हा सण हिंदू लोक एक प्रमुख सण म्हणून साजरा करतात. हा सण भारतभर धूमधडाक्यात साजरा केला जातो. धनतेरस ज्याला धनत्रयोदशी ह्या नावानी सुद्धा ओळखले जाते. धनत्रयोदशी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी ह्या तिथीला साजरा करतात. दिवाळी ह्या सणाची सुरुवात धनत्रयोदशी ह्या दिवसा पासुन होते.
29 ऑक्टोबर 2024 मंगळवार ह्या दिवशी धनत्रयोदशी हा सण साजरा करायचा आहे. ह्या दिवशी भगवान कुबेर व भगवान धन्वंतरी ह्याची पूजा करतात. शास्त्रा नुसार भगवान धन्वंतरी ह्या पूजा अर्चा केल्याने आरोग्यप्राप्ती होऊन व्यक्ति ऊर्जावान बनतो. तसेच चांगल्या भाग्यासाठी सोने, चांदी व काही सामानाची खरेदी करतात. घराची साफसफाई व सजावट करतात व भगवान यम ह्यांच्यासाठी एक दिवा लावतात.
धनत्रयोदशी शुभ मुहूर्त:
धनत्रयोदशी तिथीची प्रारंभ: 29 ऑक्टोबर सकाळी 10 वाजून 31 मिनिट
धनत्रयोदशी तिथी समाप्ती: 30 ऑक्टोबर 2024 दुपारी 1 वाजून 15 मिनिट
उदय तिथी: 29 ऑक्टोबर 2024 मंगळवार
धनत्रयोदशी पूजा विधीसाठी महत्वाचा काळ मानला जातो.
पंचांग नुसार 29 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजून 04 मिनिट टे 8 वाजून 27 मिनिट पर्यन्त
प्रदोष काळ: संध्याकाळी 6 वाजून 01 मिनिट पासुन रात्री 8 वाजून 27 मिनिट पर्यन्त
वृषभ काळ: संध्याकाळी 7 वाजून 04 मिनिट ते रात्री 9 वाजून 08 मिनिट पर्यंत
धनत्रयोदशी 2024 अनुष्ठान:
धनत्रयोदशी ह्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. घराची साफ सफाई करावी दारा समोर सडा रांगोळी घालावी. दिवा बत्ती करावी. शुभ मुहूर्तवर सोने चांदी किंवा घरातील इतर वस्तु खरेदी कराव्या. कारण की हा दिवस खरेदी करण्यासाठी चांगला आहे. संध्याकाळी चार मुखी वातीचा भगवान यम ह्यांच्या साठी लावावा. असे म्हणतात की भगवान यम आपल्या सर्व समस्या दूर करतात.
धनत्रयोदशी ह्या दिवसाचे महत्व:
धार्मिक मान्यता अनुसार धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथी ला समुद्र मंथनच्या वेळी भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. म्हणूनच ह्या तिथीला धनत्रयोदशी तिथी म्हणून संबोधले जाते. असे म्हणतात की भगवान धन्वंतरी हयाना भगवान विष्णु ह्यांचा अवतार मानले जाते. धनत्रयोदशी ह्या दिवशी भगवान धन्वंतरी ह्यांच्या बरोबर विष्णु प्रिया माता लक्ष्मी, धनाचे देवता भगवान कुबेर व मृत्यूचे देवता यमराज ह्यांची पूजा केली जाते. भगवान धन्वंतरी जेव्हा समुद्र मंथनच्या वेळी हातात कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून भांडी खरेदी करण्याची सुद्धा प्रथा आहे.
धनत्रयोदशी खरेदी करण्याची शुभ वेळ:
धनत्रयोदशी ह्या दिवशी खरेदी करण्याची शुभ वेळ म्हणजे अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 42 मिनिट ते दुपारी 12 वअजून 27 मिनिट पर्यन्त
धनत्रयोदशी पूजा विधी:
संध्याकाळी स्वच्छ स्नान करून पूजा करायला बसावे. प्रथम पूजा करायची जागा स्वच्छ करावी त्यावर चौरंग ठेवावा त्यावर गंगाजल शिंपडून लाल किंवा पिवळे वस्त्र घालावे.
चौरंगावर गहू तांदूळ ची रास ठेवावी. मग गणपती, लक्ष्मी, मातीचा हत्ती, भगवान कुबेर व भगवान धन्वंतरी ह्याच्या प्रतिमा ठेवाव्या.
सर्वात पहिल्यांदा गणेशजी ची विधी पूर्वक पूजा करावी त्यांना फुले व दूर्वा अर्पण कराव्या. मग हातात अक्षता घेऊन भगवान धन्वंतरी चे ध्यान करावे. मग भगवान भगवान धन्वंतरी ह्यांना पंचामृत ने अभिषेक करून चंदन लावून पिवळ्या रंगाची फुले अर्पित करावी. मग फळे व नेवेद्य अर्पित करावा. मग भगवान धन्वंतरी ह्यांचा मंत्र जाप करून त्याच्या समोर तेलाचा दिवा लावावा. मग आरती म्हणावी व पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी. मग माता लक्ष्मी व भगवान कुबेर ह्याची पूजा करावी. आपल्या मुख्य दरवाजावर दोनी बाजूला तेलाचा दिवा लावावा.
भगवान कुबेर व लक्ष्मी माता मंत्र:
धनत्रयोदशी ह्या दिवशी ह्या मंत्राचा जप केल्यास अपार ध्यान प्राप्ती होते असे म्हणतात.
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥