दिवाळीला लक्ष्मी पूजन 2024 अगदी सोप्या पद्धतीने कसे करावे, शुभ मुहूर्त, संपूर्ण माहिती
Diwali Lakshmi Pujan 2024 Agadi Sopya Padhtine, Shubh Muhurat In Marathi
दिवाळीला लक्ष्मी पूजन प्रदोश काळामध्ये सूर्यास्त नंतर मुहूर्तमध्ये केले जाते.
दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशी पासुन सुरू होते. ते भाऊबीज पर्यन्त असते म्हणजेच साधारण पणे 5 ते 6 दिवसाची दिवाळी असते. दीपोत्सव चा पावन पर्व शुभ दीपावली गुरुवार, 31 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. ह्या वर्षी अमावस तिथी दोन दिवसाची आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन चे विशेष महत्व असते.
धर्म शास्त्रा नुसार कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथी ला समुद्र मंथन च्या वेळी माता लक्ष्मी प्रकट झाली होते. तेव्हा पासून दर वर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला प्रदोष काळामध्ये दिवाळीला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे.
दिवाळमध्ये लक्ष्मी पूजनची परंपरा ही मार्कंडेय पुराणमध्ये सांगितल्या प्रमाणे पृथ्वीवर चारी बाजूनी अंधकार होता तेव्हा एक प्रखर प्रकाशाच्या बरोबर कमळावर विराजमान माता लक्ष्मी प्रकट होऊन तिने अंधकार दूर केला होता म्हणून लक्ष्मी पूजन करून दिवे लावायची परंपरा आहे.
दिवाळी लक्ष्मी पूजन महत्व व विधी:
दिवाळीमध्ये महालक्ष्मीची पूजा करणे विशेष महत्वाचे आहे. दिवाळीमध्ये धन व सुख-समृद्धी देणारी माता लक्ष्मीच्या पूजे बरोबर भगवान गणेश, कुबेर देवता व ज्ञान ची देवी माता सरस्वतीची पूजा केली जाते. दिवाळी मध्ये प्रदोष काळामध्ये सूर्यास्त नंतर मुहूर्तवर केली जाते.
दिवाळी मध्ये माता लक्ष्मीची पूजा प्रदोष काळा मध्ये स्थिर लग्नमध्ये करणे सर्वोतम मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार दिवाळी लक्ष्मी पूजनच्या दिवशी माता लक्ष्मी वैकुंठ धाम मधून पृथिवर भ्रमण करण्यासाठी येवून प्रतेक घरात जाऊन ती पहाते घराची साफसफाई, सुंदर सजावट व विधिपूर्वक पूजा केली आहे की नाही. ज्या घरांमध्ये साफसफाई करून सुंदर सजावट केली आहे तेथे माता लक्ष्मी विराजमान होऊन कृपा दृष्टी देते.
दिवाळीमध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न केल्याने जीवनात सुख, संपन्नता, धन-धान्य, समृद्धि व अपार धन-दौलतची प्राप्ती होते. माता लक्ष्मी प्रतेक मनोकामना पुर्ण करते.
आता आपण पाहू या लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त व विधी पूर्वक पूजा कशी करायची:
दिवाली 2024- अमावस्या तिथि पूजा मुहूर्त:
कार्तिक अमावस्या तिथि प्रारंभ- 31 ऑक्टोबर दुपारी 3:52 मिनिट पासून
कार्तिक अमावस्या तिथि समाप्त- 01 नोव्हेंबर संध्याकाळी 06:16 मिनट पर्यन्त
दिवाली लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त (1नोव्हेंबर 2024)
लक्ष्मी पूजा मुहूर्त – 06:00 पासून 08:30 पर्यन्त
लक्ष्मी पूजा संपूर्ण पूजा विधि:
तसे पहिले तर दिवाळीच्या काही दिवस अगोदरच घराची साफ-सफाई केली जाते. तरीपण दिवाळीच्या एक दिवस अगोदर परत घराची साफ-सफाई करा. घरातील वातावरण शुद्ध व पवित्र करून गंगाजल शिंपडा.
घराच्या मुख्य दरवाजा समोर सडा रांगोळी काढून तोरण बांधा व दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक व शुभ लाभची आकृति काढा.
संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी पूर्व दिशा किंवा ईशान कोना साफ करून तेथे एक चौरंग ठेवा, चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा.
मग त्यावर भगवान गणेशजीनची मूर्ती विराजीत करा व डाव्या हाताला माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. त्याच बरोबर पाणी भरून एक कलश ठेवा.
मग सर्व पूजेचे साहित्य बरोबर घेवून आसनावर बसून चारी बाजूला गंगाजल शिंपडून पूजेचा संकल्प करून पूजा आरंभ करा.
सर्वात प्रथम भगवान गणेश ह्यांना नमस्कार करून हळद-कुंकू, गंध, अक्षता, फुल व भोग अर्पित करा.
भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा करताना माता लक्ष्मीला हळद-कुंकू लाऊन पूजेचे साहित्य भेट करा.
मग भगवान गणेश, माता लक्ष्मी व कुबेर भगवान ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा करून माता सरस्वतीची सुद्धा पूजा करा.
पूजा अर्चा केल्यावर परिवारातील सर्व व्यक्तिनी मिळून गणेश भगवान व माता लक्ष्मीची आरती, मंत्र व स्तुति म्हणावी.
आरती व मंत्र जाप झाल्यावर घरातील प्रतेक कोनामध्ये दिवे लावावे.
महालक्ष्मी पूजन झाल्यावर तिजोरी व वहीखाताची पूजा अर्चा करावी.
पूजा झाल्यावर आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा अर्चा करावी व भोग अर्पित करावा.
लक्ष्मी पूजाच्या दिवशी म्हणावयाचे मंत्र:
* भगवान गणेश आवाहन मंत्र:
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
* दिवाली लक्ष्मी पूजन मंत्र:
ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः
ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा
ॐ श्री ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मयै नमः