Bali Pratipada Diwali Padwa 2024 Shnubh Muhurt Puja Vidhi And Importance In Marathi
बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा शुभ मुहूर्त पूजा विधी, महत्व, उपाय व भगवान विष्णु आशीर्वाद कसा मिळवावा
दिवाळी पाडवा ह्या दिवसाला बलि प्रतिपदा असे सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी बलि पूजा केली जाते. ही पूजा कार्तिक प्रतिपदा ह्या दिवशी करतात. जी दिवाळी लक्ष्मी पूजनच्या दुसऱ्या दिवशी असते. बलि पूजा व गोवर्धन पूजा ही एकाच दिवशी करतात. जी गोवर्धन पूजा गिरीराज पर्वत व भगवान श्री कृष्ण ह्यांना समर्पित आहे. तीच पूजा बलि पूजा दानवांचे राजा बलि चा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आहे.
बलि प्रतिपदा काय आहे?
राजा बलि ला भगवान विष्णु ह्यांच्या कडून अमरत्वचा आशीर्वाद प्राप्त झाला होता. असे म्हणतात की त्यांची पूजा अर्चा केली तर जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. त्याच बरोबर सर्व कामात सफलता मिळते.
बलि प्रतिपदा पूजा शुभ मुहूर्त:
बलि प्रतिपदा 2 नोव्हेंबर 2024 शनिवार
प्रतिपदा तिथी 1 नोव्हेंबर 2024 संध्याकाळी 6 वाजून 16 मिनिट प्रारंभ
प्रतिपदा तिथी समाप्त: 2 नोव्हेंबर 2024 रात्री 8 वाजून 21 मिनिट
बलि प्रतिपदा पूजा मुहूर्त:
बलि प्रतिपदा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 06 मिनिट ते रात्री 8 वाजून 20 मिनिट
बलि प्रतिपदाचे महत्व:
बलि प्रतिपदा च्या दिवशी दैत्य राज बलि \ची पूजा केली जाते. पौराणिक कथा नुसार बलि एक महान दानवीर होते ज्यांनी भगवान विष्णु ह्यांना तिनो लोकांचे दान दिले होते. भगवान विष्णु ह्यांनी प्रसन्न होऊन त्यांना वैकुंठ मध्ये स्थान दिले होते. व त्यांना देवतांच्या पूजे समान पूजण्याचा आशीर्वाद दिला होता.
बलि प्रतिपदा ह्या दिवसाचे महत्व शिकवते. बलि च्या दानाचे गुणगान संपूर्ण धर्मग्रंथामध्ये दिले आहे. ह्या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते. भारतात बऱ्याच भागात नवीन वर्ष ह्या रूपात साजरे केले जाते. ह्या दिवशी नवीन वर्षाची सुरवात होते.
2 नोव्हेंबर 2024 शनिवार ह्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध बलि प्रतिपदा हा दिवस पाडवा म्हणून साजरा करायचा आहे. साडेतीन मुहूर्ता पैकी एक असा हा दिवस आहे.
म्हणजेच ह्या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. पाडवा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. ह्या दिवशी पूर्ण दिवस शुभ मानला जातो. सोने खरेदी करण्यास हा दिवस चांगला मानला जातो तसेच ह्या दिवशी सुवासिनी आपल्या पतीला औक्षण करतात, व्यापारी वर्षाचा प्रारंभ ह्या दिवसाला सुरू होतो.
पौराणिक कथा नुसार बलप्रतिपदा ह्या दिवशी माता पार्वतीने भगवान शंकर हयाना द्युत ह्या खेळात हरवले होते म्हणून ह्या दिवसाला द्युत प्रतिपदा असे सुद्धा म्हणतात. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा पुत्र होता. त्याने राक्षस कुळात जन्म घेतला होता तरीही तो चारित्र्यवान, विनयशील, राजा म्हणून त्याची ओळख होती. तो दानशूर म्हणून सुद्धा प्रसिद्ध होता. पुढे त्याने आपल्या शक्तीने देवांचा सुद्धा पराभव केला होता. नंतर बळिराजला हरवण्यासाठी भगवान विष्णु यांची निवड केली. मग बळीराजानि यज्ञ केला तेव्हा यज्ञ केल्यावर दान देण्याची प्रथा होती. तेव्हा भगवान विष्णु यांनी वामनावतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजा समोर उभे राहिले या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
वचनाला जागून बळिराजाने ही दान देण्याची तयारी दर्शवली तेव्हा वामन अवतारी विष्णुयांनी प्रचंड रूप धरण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवायला जागा राहिली नाही त्यामुळे वामनाने तिसरे पाऊल बळिराजाच्या डोक्यावर ठेऊन त्याला पाताळ लोकचे राज्य बहाल केले. बळीराजा सत्व शील, दानशूर होता त्याच्या ह्या गुणांमुळे बळिराजाला पाताळ लोकांचे राज्य बहाल करून त्याला दिलाकी कार्तिक प्रतिपदा ह्या दिवशी लोक तुझ्या दानशूर तेची, क्षमा शिलतेची पूजा करतील.
पाडव्याला पंचरंगी रंगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. इडा, पिडा टळो व बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाके वाजवून दिव्याची रोषणाई केली जाते. हा दिवस साडे तीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त म्हणून साजरा करतात.
पाडवा हा दिवस व्यापारी लोकांसाठी आर्थिक हिशोबच्या दृष्टीने नव वर्ष मानले जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्याची पूजा करून नवीन वर्षाचा आरंभ करतात. जमा खर्च च्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू करतात. वह्याना हळद-कुंकू, गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करतात व नवीन व्यवहार सुरू केले जातात. महाराष्ट्रमध्ये महिला ह्या दिवशी संध्याकाळी साज शृंगार करून पाटा भोवती रांगोळी पत्नी पतीचे औक्षण करते व पती आपल्या पत्नीला काही भेट वस्तु देतो. आपल्याकडे नवीन विवाहित मुलीची दिवाळी माहेरी साजरी करतात. व जावयाला काही आहेर देतात.
बलि प्रतिपदा पूजाविधी:
सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा घरात गंगाजल शिंपडून घ्या.
मग चौरंगावर भगवान विष्णु व राजा बलिची प्रतिमा व गोवर्धन पर्वतची प्रतिमा बनवून ठेवा व त्याची पूजा करा.
हळद-कुंकू, अक्षता, फूल, मिठाई अर्पित करा.
भगवान विष्णु व राजा बलि चे ध्यान करून आरती करा.
बलि प्रतिपदा च्या दिवशी गौमाताची पूजा केरणे विशेष महत्वाचे मानले जाते. म्हणून ह्यादिवशी गाईला गूळ व गवत सेवन करण्यासाठी देतात.
बलि प्रतिपदा ह्या दिवशी पूजा करण्याचे लाभ:
बलि प्रतिपदा च्या दिवशी पूजा केल्याने घरात धन-धान्य व सुख-समृद्धी येते.
बलि प्रतिपदाच्या दिवशी पूजा कल्याने जीवनातिल सर्व बाधा दूर होऊन रोगा पासून मुक्ती मिळते.
राजा बलिची पूजा केल्याने परिवारात सामंजस्य व एकता टिकून राहते.
कृषि व पशुपालन मध्ये सफलता मिळण्यासाठी गोवर्धन पूजा व गाईची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. त्यामुळे पशुधनमध्ये वृद्धी येवून शेत चांगली पिकतात.
बलि प्रतिपदा ह्या दिवशी करावयाचे उपाय:
बलि प्रतिपदा ह्या दिवशी गाईला गूळ व गवत सेवन करायला द्या, पशुपक्षांची सेवा करा.
गरीब लोकांना भोजन, वस्त्र व धन ह्यांचे दान करणे विशेष महत्वाचे आहे.
बलि प्रतिपदा ह्या दिवशी जास्तीत जास्त दुसऱ्यांना मदत करा. कोणाला दुखवू नका.