17 सोप्या उपयुक्त किचन टिप्स अँड ट्रिक्स | किचन हॅक्स रोजच्या जीवनात वापरुन वेळ व पैसा वाचेल
17 Amazing Useful Kitchen Tips & Tricks | Kitchen Hacks In Marathi
आपण स्वयंपाक करतो त्यासाठी वेळची बचत व गॅसची बचत होऊन कमी वेळा स्वयंपाक कसा बनवू शकतो त्यासाठी काही सोप्या किचन टिप्स व ट्रिक्स दिल्या आहेत. त्या आपण रोजच्या दैनंदिन जीवनात वापरुन वेळची व पैशांची बचत करू शकता.
1. डाळ तांदूळ कुकरमद्धे लावताना प्रथम धुवून 30 मिनिट पाणी घालून ठेवा मग कुकर मध्ये ठेवा त्यामुळे वेळ व गॅसची बचत होते व स्वयंपाक लवकर बनतो.
2. कुकरची रिंग खराब झाली, तर डाळ कुकरमद्धे ठेवून डाळीला उकळी येवू द्या, मग कुकरच्या झाकणाला आतून तेल किंवा तूप लावा, मग कुकरचे झाकण लावा, त्यामुळे शिट्टी लवकर येते व डाळ पण लगेच शिजते.
3. पास्ता शिजवताना प्रथम 15 मिनिट पाण्यात भिजत ठेवा मग जास्तीचे पाणी घालून शिजवून घ्या त्यामुळे गॅसची बचत होते व पास्ता एकसारखा शिजतो.
4. कढी बनवताना बऱ्याच जणी म्हणतात की कढी फुटते, प्रथम एका भांड्यात दही घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ व बेसन घालून रवीच्या सहयानी मिक्स करून घ्या. मग कढी बनवा फुटणार नाही.
5. चहा बनवताना आले घालायचे असेलतर, चहाला उकळी आली की मग त्यामध्ये किसलेले आले घाला मग परत एक छान उकळी येवू द्या मग चहा गाळून सर्व्ह करा.
6. भाजी मध्ये मीठ जास्त झाले तर, दुसऱ्या एका कढईमध्ये बेसन थोडे भाजून घ्या मग भाजी मध्ये मिक्स करून भाजी परतून घ्या, त्यामुळे जास्तीचे मीठ बेसन मध्ये मिसळून जाईल.
7. लिंबू थोडा वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवले तर कापल्यावर लिंबा मधून जास्त रस निघतो.
8. जर भाजी थोडी जळली व भांड्याला खाली लागली तर 2 चमचे दही घालून मिक्स करावे त्यामुळे भाजी खाताना करपट वास येत नाही.
9. भात शिजत असताना त्यामध्ये 2 थेंब लिंबुरस घालून मिक्स केल्यास भात छान मोकळा होतो चिकट होत नाही.
10. कांदा फ्राय करताना कांद्याला थोडा लिंबुरस लावून फ्राय केला तर छान गुलाबी रंग येतो.
11. मेथीचा कडवट पणा कमी करण्यासाठी पाण्यात थोडे मीठ घालून त्यामध्ये थोडा वेळ ठेवा मग बाहेर काढा.
12. नूडल्स उकलत्या पाण्यात घातल्यावर शिजल्या की मग त्यामध्ये थोडे थंड पाणी घाला त्यामुळे त्या एकमेकांना चिटकत नाहीत.
13. जर रसा भाजी मध्ये पाणी जास्त झाले तर त्यामध्ये थोडे बेसन भाजून टाका किंवा ब्रेडचा चुरा टाकू शकता.
14. मिरची पावडरच्या डब्यात थोडे हिंग घालून ठेवले तर मिरची पावडर जास्त दिवस छान ताजी राहते.
15. आपल्या कडे वेळेची कमतरता आहे व तीन वेळेच्या चपात्या बनवून ठेवल्या व वरतून थोडेसे व्हेजिटेबल ऑइल लावून झिप लॉकच्या बॅग मध्ये भरून ठेवल्या व पाहिजे तेव्हा मायक्रोवेव्ह् मध्ये गरम करून ताज्या चपात्या सारख्या लागतात.
16. पालकची भाजी बनवताना त्यामध्ये एक चिमूट साखर घाला त्यामुळे पालक चा रंग बदलणार नाही.
17. दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना त्यामध्ये थोडी मलई घातली तर त्याची टेस्टि लागतो.