कार्तिक पूर्णिमा देव दिवाळी त्रिपुरी पूर्णिमा (15 नोव्हेंबर) तिथी स्नान दान शुभ मुहूर्त पूजाविधी व महत्व
Kartik Purnima Dev Diwali Tripuri Purnima 2024 Snan Daan Shubh Muhurat Puja Vidhi w Mahatw In Marathi
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी देव दिवाळी साजरी करतात. ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा व पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तिlला सर्व कष्टा पासून मुक्ती मिळते असे म्हणतात.
हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा ह्या तिथीला खूप महत्व आहे. ही तिथी भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांना प्रसन्न करण्यासाठी व आशीर्वाद मिळण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. धार्मिक मान्यता अनुसार कार्तिक पूर्णिमा देव दिवाळी ह्या दिवशी सर्व देव दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवर येवून गंगा घाटावर दिवाळी साजरी करतात. असे सुद्धा म्हणतात की ह्या दिवशी भगवान शिव ह्यांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे ह्या दिवसाला त्रिपुरी पूर्णिमा असे सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी स्नान करण्या बरोबर भगवान शिव-पार्वती ची पूजा अर्चा केल्याने आशीर्वाद मिळतात.
कार्तिक पूर्णिमा तिथी:
वैदिक पंचांग नुसार कार्तिक महिन्यातील पूर्णिमा तिथीची सुरुवात 15 नोव्हेंबर सकाळी 6 वाजून 19 मिनिट पासून सुरू होत असून समाप्ती 16 नोव्हेंबर सकाळी 2 वाजून 58 मिनिट पर्यन्त आहे.
कार्तिक पूर्णिमा स्नान दान शुभ मुहूर्त:
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी स्नान दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 4 वाजून 58 मिनिट पासून 5 वाजून 51 मिनिट पर्यन्त आहे.
कार्तिक पूर्णिमा 2024 कधी आहे:
कार्तिक पूर्णिमा- 15 नोव्हेंबर 2024, शुक्रवार
पूर्णिमा तिथि प्रारंभ – 15 नोव्हेंबर 2024, शुक्रवार सकाळी: 06:19
पूर्णिमा तिथि समाप्त – 16 नोव्हेंबर 2024, शनिवार पहाटे सकाळी 02:58
कार्तिक पूर्णिमा 2024 गंगा स्नान मुहूर्त:
प्रात: काल 04:58 पासून प्रातःकाल 05:51 पर्यन्त
कार्तिक पूर्णिमा 2024 चंद्रोदय वेळ:
पूर्णिमाच्या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 4:51
देव दिवाळी 2024 शुभ मुहूर्त:
देव दीपावली पूजा मुहूर्त 15 नोव्हेंबर संध्याकाळी 5:10 पासून 7:47 पर्यन्त
कार्तिक पूर्णिमा लक्ष्मी पूजन मुहूर्त 2024:
कार्तिक पूर्णिमा लक्ष्मी पूजन मुहूर्त 15 नोव्हेंबर रात्री 11:39 पासून रात 12:33 पर्यन्त
कार्तिक पूर्णिमा चौघड़िया मुहूर्त 2024:
चर – सामान्य- सकाळी 06:44 पासून सकाळी 08:04
लाभ – उन्नति – सकाळी 08:04 पासून प्रातः 09:25
शुभ – उत्तम – दुपारी 12:06 पासून दुपारी 01:26
चर – सामान्य – संध्याकाळी 4:07 पासून संध्याकाळी 05:27
लाभ – उन्नति – संध्याकाळी 08:47 से संध्याकाळी 10:26
शुभ – उत्तम – रात्री उशिरा 12:06 पासून रात्री उशिरा 01:46 (16 नोव्हेंबर)
कार्तिक पूर्णिमा पूजा विधि:
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान व दीपदान करणे विशेष महत्वाचे आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी योग्य वेळेवर नदी वर स्नान केल्याने व्यक्तिला सर्व पापा पासून मुक्ती मिळते. तसेच ह्या दिवशी जरूरत मंद लोकांना दान करणे चांगले मानले जाते.
कार्तिक पूर्णिमा पूजाविधी:
सकाळी लवकर उठावे.
आपले घर स्वच्छ ठेवावे व सूर्याला आद्य द्यावे.
भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा अर्चा करा.
व्रत करण्याचा संकल्प करावा.
भगवान विष्णु ह्यांना सुगंधित फूल अर्पित करा व वस्त्र अर्पित करा.
गाईच्या तुपाचा दिवा लावावा, आरती करा व भगवान विष्णु ह्यांचा मंत्र जाप करा.
फळ, मिठाई चा भोग अर्पित करा.
गरीब लोकांना दान देणे चांगले मानले जाते.
देव दीपावली प्रदोष काळ शुभ मुहूर्त (Dev Deepawali 2024 Shubh Muhurat)
पंचांग अनुसार, देव दीपावली ह्या दिवशी प्रदोष काळ मुहूर्त 15 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वाजून 10 मिनट पासून 7 वाजून 47 मिनट पर्यन्त आहे. एकूण पूजा वेळ 2 तास 37 मिनट आहे.
कार्तिक पूर्णिमा महत्व (Kartik Purnima Significance)
कर्तीक पूर्णिमा ह्या दिवशी भगवान विष्णुनि रक्षसा पासून ऋषि मुनींना रक्षण मिळावे म्हणून मत्स्य अवतार घेतला होता ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे व दान करणे विशेष महत्वाचे मानले जाते. त्यामुळे व्यक्तिला शुभ फळ मिळतात व जीवनातील कष्ट कमी होण्यास मदत मिळते. तसेच ह्या दिवशी भगवान कार्तिक ह्यांचा जन्मदिवस सुद्धा आहे.