कार्तिक पूर्णिमा 2024 च्या दिवशी 5 उपाय केले तर माता लक्ष्मी धनानी भरेल आपले घर
Kartik Purnima 2024 Satik 5 Upay In Marathi
धार्मिक मान्यता अनुसार कार्तिक पूर्णिमा च्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने व्यक्तिच्या धना संबंधित सर्व समस्या दूर होतील. ज्योतिष शास्त्रा नुसार कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी काही उपाय केलेतर आपल्या घरात धनाचे आकर्षण होईल.
हिंदू धर्मामध्ये कार्तिक पूर्णिमा ही सर्वात महत्वाची मानली जाते. ह्या पूर्णिमाला भगवान महादेवची खास पूजा अर्चा व व्रत केल्याने विशेष लाभ मिळतात.
कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी भगवान शिव ह्यांना प्रसन्न करण्याच्या बरोबर माता लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले जातात. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चा आवर्जून करा.
धार्मिक मान्यता अनुसार कार्तिक पूर्णिमाला शुभ मुहूर्तवर पूजा अर्चा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व जीवनातील दुख-संकट दूर होतात. कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी लक्ष्मी चालीसाचे वाचन जरूर करावे. त्यामुळे धनात वृद्धी होऊन आर्थिक तंगी पासून छुटकारा मिळेल.
कार्तिक पूर्णिमा कधी आहे:
वैदिक पंचांग अनुसार कार्तिक महिन्यातील पूर्णिमा तिथी सुरुवात 15 नोव्हेंबर सकाळी 6 वाजून 19 मिनिट होत असून पूर्णिमा समाप्ती 16 नोव्हेंबर रात्री 2 वाजून 58 मिनिटला होणार म्हणून पूर्णिमा 15 नोव्हेंबर 2024 शुक्रवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी काय करावे?
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी घराची साफ-सफाई करून घ्या मग भगवान विष्णु, माता लक्ष्मी ह्यांची विधिपूर्वक पूजा अर्चा करून फळ व मिठाई भोग म्हणून दाखवा. असे केल्याने घरात धन लाभाचे योग येऊ शकतात. कार्तिक पूर्णिमा च्या दिवशी माता तुळशीची पूजा केल्यास जीवनात येणाऱ्या सर्व परेशानी नष्ट होतात. तसेच कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध व जल अर्पित करा.
कार्तिक पूर्णिमाला करा ही उपाय:
धार्मिक मान्यता अनुसार कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी माता लक्ष्मीला खीरीचा नेवेद्य दाखवा. पूजेच्या वेळी लक्ष्मी माताला पिवळ्या रंगाच्या कवड्या अर्पित करा मग दुसऱ्या दिवशी त्या कवड्या तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये वास करते, म्हणूनच कार्तिक पूर्णिमा च्या दिवशी स्नान झाल्यावर पिंपळाच्या झाडाला दुधामध्ये साखर मिक्स करून वहावे, असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरावर नेहमी कृपा ठेवते.
चंद्र देवाची पूजा करण्यासाठी पूर्णिमा हा दिवस अतिउत्तम आहे. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी चंद्राला अर्ध्य दिल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. असे केल्याने व्यक्तिच्या कुंडलीतील चंद्र ग्रहाची स्थिति मजबूत होते. म्हणून ह्यादिवशी चंद्राला अर्ध्य द्यावे.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी आपल्या घरच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण बांधावे दोन्ही बाजूला दिवा लावावा. आंब्याच्या पानाचे तोरण बांधणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते.
कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान व दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने कर्जातुन मुक्ती मिळते. आर्थिक स्थिति मजबूत बनते. कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी दीपदान केल्याने माता लक्ष्मी व श्रीहरी प्रसन्न होतात.