Zatpat Bottle Gourd Paratha Dudhi Paratha Lauki Paratha For Kids Recipe In Marathi
खुसखुशीत पौष्टिक दुधीभोपळयाचा स्टफ पराठा मुलांच्या नाश्तासाठी डब्यासाठी
दुधी भोपळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधी भोपळा वापरुन आपण भाजी बनवतो, हलवा बनवतो. आज आपण दुधी भोपळा वापरुन स्टफ पराठा बनवणार आहोत. दुधी भोपळाचा पराठा आपण अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. दुधी भोपळा पराठा बनवताना दुधी किसून घायचा आहे व त्याचे सारण बनवून घेऊन पराठा बनवायचा आहे.
The Zatpat Bottle Gourd Paratha Dudhi Paratha Lauki Paratha For Kids Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Bottle Gourd Paratha Dudhi Paratha Lauki Paratha For Kids
दुधी भोपल्याचा पराठा मुलांना नाश्तासाठी किंवा डब्यासाठी देवू शकता.
बनवण्यासाठी वेळ: 2० मिनिट
वाढणी: ४ पराठे
साहित्य:
आवरणांसाठी:
1 कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून रवा (बारीक)
1 टे स्पून बेसन
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
सारणासाठी:
250 ग्राम दुधी भोपळा
1-2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
1” आले (किसून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1/4 टी स्पून हळद
2 टे स्पून कोथिंबीर
1/2 वाटी आलु भुजिया
मीठ चवीने
तेल पराठे भाजण्यासाठी
कृती:
सारणासाठी: दुधी भोपळा धुवून, सोलून व किसून घ्या, मग त्यामध्ये 1/4 टी स्पून मीठ घालून मिक्स करून एक स्वच्छ मलमलचे कापड किंवा रुमाल घेऊन त्यामध्ये किसलेला दुषी घेऊन त्याची एक पुरचुंडी बनवून त्यामध्ये सर्व पाणी काढून घेऊन बाजूला ठेवा. दुधीचे पाणी आपण सेवन करू शकता किंवा आवरणाचे पीठ भिजवताना दुधीचा रस वापरुन पीठ भिजवू शकता.
एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, बेसन व मीठ घालून मिक्स करून दुधीचा काढलेला रस वापरुन पीठ भिजवून मग थोडे तेल घालून परत मळून 10 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
आता एका बाउलमध्ये दुधीचा कीस काढून घ्या, मग त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, किसलेले आले, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर, आलु भुजिया घालून मिक्स करून सारण बनवून घ्या.
दुधीचा पराठा बनवताना मळलेल्या पिठाचे चार एक सारखे गोळे बनवून घ्या,
एक गोळा घेऊन छोट्या चपाती एव्हडा लाटून त्यावर 2 टे स्पून सारण ठेवून पसरवून घ्या, मग त्यावर थोडेसे पीठ भुरभुरून एक बाजू मुडपून घ्या, मग मुडपलेल्या भागावर थोडेसे परत सारण पसरवून परत एकदा मुडपून घेऊन त्रिकोणी आकार आला की त्रिकोणी किंवा गोल आकाराचा पराठा लाटून घ्या.
तवा गरम झाला की त्यावर लटलेला पराठा घालून दोन्ही बाजूनी तेलावर किंवा तुपावर भाजून घ्या, आता गरम गरम दुधी भोपळ्याचा पराठा टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.