Zatpat Tasty Swadisht Olya Haldiche Lonche W Sewanache Fayde Recipe In Marathi
स्वादिष्ट आरोग्यदायी ओल्या हळदीचे लोणचे फायदे | Fresh Turmeric Lonche
हिवाळा सीझन चालू झाला की बाजारात ओली हळद मिळायला लागते. आयुर्वेदा प्रमाणे कच्ची हळद ही खूप आरोग्यदायी आहे. हळदीच्या सेवनाने शरीरावरची सूज कमी होते. जर सर्दीच्या समस्या असतील तर दूर होतील पचन शक्ति वाढेल तसेच रोग प्रतिकार शक्ति वाढते, रक्त शुद्ध होते व कर्क रोगासारख्या आजाराशी लढण्यास मदत होते.
The Zatpat Tasty Swadisht Olya Haldiche Lonche Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Turmeric Lonche W Benefits
ओली हळद इंसुलिनची पातळी नीट राहते तसेच ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात राहते. ओल्या हळदीच्या सेवनाने लिव्हरचे आरोग्य सुधारते, आपली स्कीन चांगली राहते.
साहित्य:
२५० ग्राम ओली हळद
१” आले तुकडा
२ टे स्पून मोहरीची डाळ
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून साखर
१ टी स्पून मीठ किंवा लागेल तसे
१ टे स्पून लिंबुरस
फोडणी करिता:
२ टे स्पून तेल
१/२ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
कृती:
ओली हळद व आले स्वच्छ धुवून सोलून पुसून किसून घ्या. मोहरीची पूड करून घ्या, मग मोहरीची पूड थोड्या तेलात फेसून घ्या.
एका बाउलमध्ये किसलेली हळद, आल, लाल मिरची पावडर, मीठ लिंबुरस मोहरी पूड मिक्स करून घ्या.
एका फोडणीच्या वाटीत तेल गरम करून त्यामध्ये जिरे व हिंग घालून मिक्स करून बनवलेली फोडणी किसलेल्या हळदीवर घालून मिक्स करून बरणीमध्ये भरून ठेवा. २-३ दिवस बरणीचे झाकण काढून वरखाली लोणचे हलवून परत घट्ट झाकण लाऊन ठेवा.
आता आपले चटपटीत ओल्या हळदीचे लोणचे सर्व्ह करा.