मार्गशीर्ष गुरुवार व्रत 2024 उद्यापन कधी करावे? एकादशी आहे, मासिक पाळी आली सूतक आहे
Margashirsha Guruvar 2024 Udyapan Kadhi Karave? Ekadashi ahe,Masik Pali,Sutak Aahe Mahiti In Marathi
2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरवात झाली. ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आहेत. तर आपल्याला चारही गुरुवार व्रत करावयाचे आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील दिनांक 5 व 12 ह्या दिवशी गुरुवारचे व्रत करून झाले आहे. आता मार्गशीर्ष महिन्यातील दिनांक 19 व 27 ह्या दिवशी व्रत करावयाचे आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी एकादशी आली आहे. तरी सुद्धा आपल्याला एकादशी असली तरी उद्यापन करावयाचे आहे.
The Margashirsha Guruvar 2024 Udyapan Kadhi Karave? Ekadashi ahe,Masik Pali,Sutak Aahe Mahiti In Marathi can be seen on our You tube Chanel Margashirsha Guruvar 2024 Udyapan Mahiti In Marathi
जर काही जणांचा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा उपवास आहे व एकादशी चा उपवास आहे तरी दोन्ही उपवास करावे, संध्याकाळी उपवसाच्या थाळीचा नेवेद्य दाखवून उद्यापन करावे पण उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा. ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी गुरुवारच्या व्रताचा उपवास करून उद्यापन करून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे.
तसेच चौथ्या गुरुवारी मासिक पाळी आली तर चौथ्या गुरुवारी उद्यापन नकरता पाचव्या गुरुवारी उद्यापन करावे, पण उपवास करावा मोबाइलवर कथा आईकली तरी चालू शकते. उद्यापन केल्या शिवाय आपले मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मी माताचे व्रत पूर्ण होत नाही. तर तुम्ही म्हणताल पौष महिना चालू होत आहे. तर पौष महिना असला तरी चालेल उद्यापन करावे. तर 2 जानेवारी 2025 ह्या दिवशी उद्यापन करावे.
जर चौथ्या गुरुवारी आपल्याला सूतक लागले आहे. तर उद्यापन आपण पाचव्या गुरुवारी म्हणजे 2 जानेवारीला करावयाचे आहे. जर आपल्याला तिसऱ्या गुरुवारी व चौथ्या गुरुवारी सुद्धा सूतक आहे. तर आपण 2 जानेवारी 2025 व 9 जानेवारी 2025 ह्या दोन्ही गुरुवारी पूजा मांडून उपवास करून व्रत करावयाचे आहे व 9 जानेवारी ह्या दिवशी उद्यापन करावयाचे आहे. कारण की ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आले आहेत व आपले चारही गुरुवार व्रत होऊन चौथ्या गुरुवारी उद्यापन झाले पाहिजे. तरच आपले मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूर्ण होऊ शकते.