26 December 2024 Saphala Ekadashi Puja Vidhi Mahatva Katha aur Upay In Marathi

सफला एकादशी 2024 वर्षातील शेवटची एकादशी पूजाविधी महत्व कथा व उपाय

26 December 2024 Saphala Ekadashi Puja Vidhi Mahatva Katha aur Upay In Marathi

सफला एकादशी 26 डिसेंबर 2024 गुरुवार ह्या दिवशी आहे. ह्या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. सफला एकादशी ह्या दिवशी व्रत ठेवले जाते. ह्या दिवशी भगवान अच्युत व भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा केली जाते. सफला एकादशी ह्या दिवशी संपूर्ण दिवस व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते ह्या दिवशी गरीब व ब्राह्मण ह्यांना भोजन देणे शुभ मानले जाते.

The 26 December 2024 Saphala Ekadashi Puja Vidhi Mahatva Katha aur Upay In Marathi can be seen on our You tube Chanel 26 December 2024 Saphala Ekadashi

सफला एकादशी शुभ मुहूर्त:
सफला एकादशी आरंभ: 25 डिसेंबर 2024 बुधवार रात्री 10:29 मिनिट
सफला एकादशी समाप्ती: 27 डिसेंबर 2024 शनिवार मध्य रात्री 12:43 मिनिट पर्यन्त
सफला एकादशी पारायण: 26 डिसेंबर 2024 सकाळी 7:12 मिनिट पासून 9:16 मिनिट पर्यन्त

सफला एकादशी महत्व:
सफला एकादशी ह्या दिवशी भगवान अच्युत ह्यांची पूजा अर्चा केली जाते त्याच बरोबर भगवान श्रीहरी ह्यांची सुद्धा पूजा अर्चा केली जाते. असे म्हणतात की ह्यादिवशी रात्री जागरण केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ही दिवशी श्रद्धालु मोठ्या प्रमाणात पूजा, हवन व भंडाराचे आयोजन करतात. ह्या दिवशी गरीब लोकांना व ब्रह्मणांना भोजन देणे शुभ मानले जाते. सफला एकादशी ह्या दिवशी मंगलकारी व्रत पूर्ण विधीपूर्वक केल्याने मनुष्यला मृत्यू नंतर विष्णु लोकची प्राप्ती होते. तसेच ही व्रत केल्याने मनुष्यला सुखी जीवन प्राप्त होते.

26 December 2024 Saphala Ekadashi
26 December 2024 Saphala Ekadashi Puja Vidhi Mahatva Katha aur Upay

सफला एकादशी कथा:
प्राचीन काळी चंपावती नगरात राजा महीष्मत राज्य करीत होते. राजाला 4 पुत्र होते, त्यामधील लुम्पक हा खूप दुष्ट व पापी होता. तो आपल्या वडिलांचे धन कुकर्म करून नष्ट करीत होता. एक दिवस राजा ने दुखी होऊन त्याला राज्या बाहेर काढले तरी सुद्धा त्याच्या मध्ये काही सुद्धा बदल झाला नाही. एकदिवशी काय झाले की त्याला 3 दिवसंपर्यंत भोजन मिळाले नाही. मग तो भटकत भटकत एका साधू महाराजांच्या झोपडीपाशी येवून पोचला सौभाग्याने तो दिवस सफला एकादशीचा होता.

साधुने त्याचा सत्कार करून त्याला भोजन दिले. साधू महाराजांच्या वर्तनाने त्याची बुद्धी परिवर्तीत झाली व तो साधूच्या चरणांशी पडला. मग साधुनी त्याला आपले शिष्य बनवले मग हळू हळू लुम्पकचे चरित्र निर्मल होत गेले. व त्यांनि एकादशीचे व्रत करायला सुरवात केली जेव्हा तो संपूर्ण बदलला तेव्हा साधु त्याच्या असली रूपात प्रकट झाला. साधूच्या वेशात लुम्पकचे वडील होते. त्यानंतर लुम्पकनि संपूर्ण राज्य व्यवस्थित सांभाळले व अजीवण एकादशीचे व्रत केले.

सफला एकादशी सटीक उपाय करा:
सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांच्या पूजेच्या वेळी नऊ मुखी दिवा लावा. दिवा लावताना त्याची वात कलवाची बनवून मग लावा. असे केल्याने आपल्या व्यवसायात प्रगती होईल. त्याच बरोबर ज्यांना कोणाला नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेल त्यांनी हा उपाय जरूर करावा.

केळ्याच्या वृक्षाची पूजा:
भगवान विष्णु ह्यांना केळ्याचे झाड अतिप्रिय आहे. सफला एकादशीच्या दिवशी केळ्याच्या वृक्षाची पूजा करणे व केळ्याच्या झाडाखाली दिवा लावणे शुभ मानले जाते. तसेच ह्या दिवशी केळ्याचे वृक्षाला 7 प्रदक्षिणा मारल्यास लग्ना मध्ये येणाऱ्या बाधा दूर होतात.

सुख- समृद्धिसाठी:
हिंदू मान्यता अनुसार तुलसीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात. सफला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपा जवळ सकाळी व संध्याकाळी पूजा करून दिवा लावावा त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

चांगले आरोग्य मिळण्यासाठी:
सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करावे. पिवळे फूल व चंदन श्री हरी ह्यांना अतिप्रिय आहे. सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना पिवळे फूल अर्पित केल्याने चांगले आरोग्य लाभते व त्याच बरोबर कष्टा पासून मुक्ती मिळते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.