मकर संक्रांती तिळाचे उपाय, रोग-दोष पासून मिळेल मुक्ती, होईल धन प्राप्ती, मुलांची प्रगती होईल
Makar Sankranti 2025 Upay For Lakshmi Prapti And For Children in Marathi
मकर संक्रांती हा सण 14 जानेवारी 2025 मंगळवार ह्या दिवशी साजरा करावयाचा आहे. मकर संक्रांतीह्या दिवशी सूर्य देव मकर ह्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याला उत्तरायण असे म्हणतात. मकर संक्रांती ह्या दिवशी स्नान झाल्यावर भगवान भास्कर ह्यांची पूजा करून आपल्या आयपती नुसार दान-धर्म करतात. मकर संक्रांती ह्या दिवशी काळे तीळचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी काळे तिळाचे उपाय केल्यास रोग दोषा पासून मुक्ती मिळते. ग्रहांचे राजा सूर्य व न्यायचे देवता शनिदेव ह्यांची कृपा मिळून आपल्या घरात आनंदी आनंद येतो.
मकर संक्रांतीवर पाहूया काळे तिळाचे काय उपाय आहेत:
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे व तिळाची मिठाई बनवणे तसेच अंघोळीच्या पाण्यात तीळ घालून स्नान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ वापरुन काही उपाय केल्याने आपले घर धनानी भरून जाते तसेच माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते.
ज्योतिष शास्त्रा नुसार मकर संक्रांती च्या दिवशी काळे तीळ एक तास भिजत घालून त्यामध्ये थोडेसे गंगाजल घालून ते पाणी अंघोळीच्या पाण्यात घालून त्याने स्नान केल्यास रोग-दोष दूर होतात तसेच आपल्या जीवनात सकारात्मकताचा संचार होऊन आर्थिक स्थिति सुधारते.
मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ वापरुन त्याचे लाडू बनवून भगवान विष्णु व माता लक्ष्मीला त्याचा भोग दाखवल्यास धन-धान्यामध्ये वृद्धी होऊन माता लक्ष्मी प्रसन्न होते.
ज्योतिष शास्त्रा नुसार मकर संक्रांतीच्या दिवशी हवन केले पाहिजे. हवन करताना त्यामध्ये काळे तीळ घातले पाहिजे. हवन करण्याच्या वेळी सूर्य मंत्राचा जाप केला पाहिजे. असे केल्याने सर्व संकटा पासून मुक्ती मिळते.
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान झाल्यावर काळे तीळ, गूळ किंवा खिचडीमध्ये काळे तीळ घालून दान करावे. असे केल्याने शनि व सूर्य ह्यांची कृपा मिळते. व भौतिक सुखाची प्राप्ती होते.
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान झाल्यावर सूर्य देवाला जल अर्पित केले पाहिजे तेव्हा पाण्यामध्ये काळे तीळ मिक्स करा असे केल्याने आपल्या करियरमध्ये सुधारणा होऊन सुख-संपदा प्राप्त होते.
मकर संक्रांती ह्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक उपाय जरूर करा. हा उपाय आपण भोगीच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी किंवा किंक्रांतच्या दिवशी सुद्धा करू शकता. आपण आपल्या मुलांच्या साठी एक दिवा लावायचा आहे त्याने आपल्या मुलांना शिक्षणता प्रगती व्हावी, चिडचिडे पणा करतात, नजरदोष दूर होण्या साठी, मुलांना नोकरी मिळण्यासाठी, बाहेरगावी राहणारी मुलांसाठी sudhaa करायचा आहे.
आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे त्यासाठी कणकेचा दिवा लाऊन त्यामध्ये दोन वतींची वात मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल किंवा अजून कोणते तेल वापरत असाल ते तेल घालावे, मग त्यामध्ये मोहरी किंवा तीळ घालून दिवा तयार करायचा आहे.
एका प्लेट मध्ये कुंकूने स्वस्तिक काढावे देवघरात दिवा लावून मुलांना आसनावर बसवून मुलांच्या समोर दिवा ठेवायचा आहे. मग 5 लवंग, पिवळी मोहरी (वाईट शक्ति साठी व लवंग नाकारात्मकता) ह्या वास्तु हातात घेऊन 7 वेळा मुलांचा उतरा करून दिव्यामध्ये लवंग व पिवळी मोहरी घालून मग दिव्यानि सुद्धा 7 वेळा मुलांचा उतरा करून मग घरातील ईशान्य दिशेला दिवा ठेवावा. त्यामुळे मुलांची प्रगती होते. सूतक असेलतर किंवा मासिक पाळी असेलतर हा उपाय करू नये.