गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी? कोणते महत्वाचे 2 आध्याय वाचावे कोणता नेवेद्य दाखवल्याचे गुरुकृपा मिळेल
13 February Guru Pratipada 2025 Full Information In Marathi
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
गुरु प्रतिपदा ही तिथी गुरुवारी येणे म्हणजे खूप शुभ मानले जाते. गुरु प्रतिपदा ह्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा केल्यास पुण्य फळ प्राप्त होऊन सुवर्ण संधि मिळण्याचा योग येतो.
13 फेब्रुवरी 2025 गुरुवार ह्या दिवशी माघ गुरु प्रतिपदा आहे. ह्या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात गुप्त झाले होते. श्री नृसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्तगुरूंचे अवतार आहेत. ह्या दिवशी त्यांचे नामस्मरण करावे व त्याची सेवा करणे शुभ मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती महाराज ह्यांच्या बरोबर श्री दत्त गुरु व त्यांची विविध रूप ह्यांची सुद्धा सेवा करणे शुभ आहे. म्हणजेच श्री दत्तगुरु व श्री स्वामी समर्थ
गुरुवार ह्या दिवशी असंख्य भक्त श्री दत्त गुरु, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, शंकर महाराज ह्यांची पूजा अर्चा नाम स्मरण करतात. आपल्या घरातील देवघरात श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ किंवा श्री साईबाबा ह्यांची मूर्ती किंवा फोटो असेलच. तसेच पादुकांच्या सुद्धा पूजा करावी.

गुरु प्रतिपदा ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे महाराज ह्यांची मूर्ती किंवा फोटो ह्यांना हळद-कुंकू, पिवळ्या रंगाची फूल अर्पित करावी. जमलेतर संपूर्ण दिवस उपवास करावा. गुरु चरित्र मधील आध्याय 51 व 52 दुपारी चार च्या वाचन करावे त्यामुळे आपल्याला त्यांची कृपा मिळेल. दुपारी नेवेद्य दाखवावा नेवेद्य दाखवताना वर्ण-भात, श्रावण घेवड्याची भाजी, (घेवड्याच्या शेगांची भाजी ह खूप महत्वाची आहे. चपाती व शिरा दाखवावा. संध्याकाळी बेसनाच्या लाडू चा नेवद्य दाखवावा. दुपारचा नेवेद्य आपण घरातील मंडळी ग्रहण करू शकता. पण लाडूचा नेवेद्य दाखवल्या नंतर झाकून तसाच ठेवावा व दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. नेवेद्य व लाडू घरीच बनवा.
ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करावा. नंतर गणपती बाप्पा, श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ ह्यांची आरती म्हणावी सेवा करताना दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेत करू नका, तसेच सेवा चारच्या आत करावी.