“जादुई मटर” Mutter Paneer Cone मटर म्हंटल की आपल्या समोर मटरचे बरेच पदार्थ येतात. आता मटरचा हंगाम चालू झाला की आपण नवीन नवीन पदार्थ शोधयला लागतॊ. हे पदार्थ करायला हरकत नाही. हे पदार्थ छोट्या पार्टीकरता करू शकता.
मुलांच्या पार्टीसाठी बनवायला छान आहते तसेच दिसायला पण चांगले दिसतील. मटर व पनीर हे पौस्टिक तर आहेच. व पनीरने सजवल्यामुळे सुंदर दिसते. कोन घरी सुद्धा बनवता येतात. मटर हे तर
साहित्य
२५० ग्राम मैदा
मीठ चवी प्रमाणे
२-३ कोनचे साचे
कोन मध्ये भरण्या साठी सारण
५०० ग्राम मटारचे दाणे
२०० ग्राम पनीर
१/२ छोटा चमचा गरम मसाला
१/२ छोटा चमचा गरम जिरे
१ छोटा चमचा लाल मिरची पावडर
१ छोटा चमचा आमचूर पावडर
१/२ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा साखर
मीठ चवीप्रमाणे
२ मोठे चमचे चीज
कृती कोनची
मैद्या मध्ये मीठ घालून मळून त्याची चपाती प्रमाणे चपाती लाटून घ्या व त्याचे लांबट तुकडे करून कोन भोवती घट्ट लावा. नंतर ते कोन तेलामध्ये तळून घेवून बाजूला ठेवा.
कृती सारणची
कढई मधॆ तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हळद व मटरचे दाणे थोडे ठेचून घाला, मीठ, लाल मिरची पावडर, साखर्र, गरम मसाला घालून एक सारखे करा व ५ मिनिट शीजल्या वर आमचूर पावडर मिसळावी. गरम गरम खायला द्या. देताना वरतून चीज किसून घालावे.