रगडा पॅटीस हा एक चवीष्ट चाट आहे. आपण जर ह्या कृती प्रमाणे बनवला तर खमंग व चवीष्ट बनेल. तसेच मुलांना पण खूप आवडेल. रगडा पॅटीस लहान मुलांच्या पार्टीला किवा वाढदिवसाच्या पार्टीला बनवता येते. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. अगदी चौपाटी सारखी होते.
The English language version of the same fast-food stall style Ragda Patties recipe and preparation method can be seen here – Homemade Ragda Patties
रगडा पॅटीस बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य
पॅटीस
६ मध्यम आकाराचे बटाटे
२-३ हिरव्या मिरचा (ठेचून)
१” आले (ठेचून)
मीठ
रगडा उसळ
२ वाटी हिरवे/ पांढरे वाटाणे (७-८ तास भिजवावे)
१ मोठा कांदा (बारीक चिरून)
२ मध्यम टोमाटो (बारीक चिरून)
१ चमचा गरम मसाला
१ मोठा चमचा चिंचेचा रस
१ मोठा चमचा गुळ
मीठ
कोथिम्बीर ((बारीक चिरून)
बारीक शेव
कृती रगडा
कढई मध्ये १ मोठा चमचा तेल गरम करून वाटाणे (शिजून), कांदा,टोमाटो , चिंच , गुळ, मीठ, गरम मसाला, लाल मिरची पावडर व पाणी घालून जरा दबदबीत रगडा बनवावा.
कृती पॅटीस
उकडलेले बटाटे कुस्करून त्यामध्ये मिरच्या, आले, व मीठ घालून मळून घ्या व त्याचे एक सारखे ८ चपटे गोळे बनऊन घ्या. तवा गरम करून पॅटीस शालो फ्राय करून घ्या.
खयला देताना प्लेटमध्ये २ पॅटीस घेऊन त्या वरती 2 डाव रगडा घालून वरतून कांदा, कोथिम्बीर, टोमाटो, बारीक शेव, चिंचेची चटणी व हिरवी पुदिन्याची चटणी घालून सर्व्ह करा.