पाणी पुरी – Pani Puri ही सर्वांची आवडती डीश आहे. त्यामुळे तोंडाला एक छान चव येते. पाणी पुरी ही आपण पार्टीला बनवू शकतो तसेच हा पदार्थ आपण संध्याकाळी नाश्ता बरोबर देवू शकतॊ. पाणी पुरी ही जग प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पाणी पुरी म्हणतात नॉर्थ मध्ये गोल गप्पे म्हणतात.
पाणी पुरीच्या पुऱ्या घरी कश्या बनवायच्या ते विस्ताराने दिलेले आहे. ह्या मध्ये पुऱ्या छान फुगल्या पाहिजेत व थोड्या कडक पण झाल्या पाहिजेत. पाणी पुरीचे पाणी बनवतांना दोन वेगवेगळे पाणी बनवले तरी चालते.
चिंचचे गोड पाणी बनवतांना चिंच १/२ तास कोमट पाण्यात भिजत घालून मग त्याचा कोळ काढून त्यामध्ये मीठ, पाणी, गुळ घालून उकळी काढून घ्यावी त्यामुळे हे पाणी खूप छान लागते.
हिरवी तिखट चटणी बनवतांना ह्या मध्ये पुदिना, सैंधव मीठ, आले, हवा असेल तर पाणी पुरी मसाला घालावा. पुदिना व आले आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे मग त्यामध्ये जास्तीचे पाणी घालून व मीठ चांगले मिक्स करावे. ही आंबटगोड गोड पाणी पुरी अगदी अप्रतीम लागते. ही पाणी पुरी घरी बनवून बघा खूप आवडेल. तसेच घरी बनवली तर बनवल्याचा आपल्याला आनंद पण मिळतो. व मनसोक्त खाता पण येते.
The English language version of the Pani Puri recipe can be seen in the article – Here
पुरीचे साहित्य
1 वाटी गव्हाचे पीठ
१ वाटी बारीक रवा
१ वाटी मैदा
१ मोठा चमचा तेल
१ १/२ चमचा मीठ
साहित्य
१/२ वाटी पांढरे वाटणे किवा छोले
2 मोठे बटाटे (उकडून तुकडे करा)
पाणी पुरीचे पाणी
२ छोटे कांदे (चिरून)
१ कप कोथिम्बीर
१ लिंबा इतकी चिंच
२ चमचे पाणी पुरी मसाला
१ चमचा सैधव मीठ
३ हीरव्या मीरच्या (वाटून)
१५-१६ पुदिना पाने (वाटून)
१ छोटा आले तुकडा (वाटून)
चिंचेची गोड चटणी
कृती
प्रथम सर्व पुरीचे साहित्य एकत्र करून माळून घ्या, नंतर त्याच्या पुऱ्या करून नंतर कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या.
कुकरमध्ये छोले,मीठ, हळद व थोडे पाणी टाकून मऊ शिजवून घ्या.
चिंचेचा कोल काढून ६ वाटी पाण्यात मिसळा. त्यामध्ये पाणीपुरीचा मसाला, हिरवी मिरची, पुदिना,आल, सैधव मीठ, व मीठ घालून हलवून घ्या.
खायला देताना पुरी फोडून त्यामध्ये २-३ छोले, २-३ बटाट्याचे तुकडे, थोडा कांदा, कोथिम्बीर,चिंचेची गोड चटणी, पुदिना चटणी घालून द्या.
किवा एका प्लेटमध्ये ६-७ पुरीमध्ये सर्व साहित्य घालून पाणी एका वाटी मध्ये द्यावे.
The video for making Pani Puri/ Golgappe at home can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=4TYxlPI9Zxw
Nice Information