कांदा पुरी-Kanda Puri ही एक चवीस्ट लागणारी डीश आहे. कांदा पुरी हा पदार्थ लवकर होणारा व सर्वांना आवडणारा आहे. कांदा पुरी ही आपण पार्टीला करू शकतो. ह्यामध्ये मी पुऱ्या घरी कश्या बनवायच्या ते दिलेले आहे. कांदा पुरीच्या च्या पुऱ्या छान कुरकुरीत बनतात. तसेच ह्यामध्ये ओला नारळ व कैरीची चटणी वापरली आहे. त्यामुळे ही डीश खूप टेस्टी लागते. लहान मुलांना तर कांदा पुरी ही डीश खूप आवडते. तसेच ह्यामध्ये बीटरूट, गाजर, कांदा घालून सजवले आहे, त्यामुळे ती पौस्टिक तर आहेच.
साहित्य
३ वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी बेसन
१/२ वाटी बारीक रवा
१/२ वाटी तांदळाचे पीठ
१/२ वाटी मैदा
१/४ वाटी तेल
१ १/२ चमचा मीठ
१ १/२ चमचा साखर
चटनीचे साहित्य
१/२ वाटी कैरीचा रस
७ -८ हिरवी मिरची
१ चहाचा चमचा मीठ
१ चहाचा चमचा जिरे
१/४ वाटी कोथिम्बीर
2 चहाचा चमचा साखर
१ वाटी नारळ
वरती सजवण्यासाठी
बीट (किसून)
गाजर (किसून)
कांदा (बारीक चिरून)
बरिक शेव
नारळ (खवलेला)
कृती
प्रथम सर्व पुरीचे साहित्य एकत्र करून माळून घ्या, नंतर त्याच्या पुऱ्या करून कागदावर पसरा
व त्यावर सुरीने टोचे मारा नंतर कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या, त्याचे तुकडे करा.
ऎक भांड्यामध्ये चटणी घ्या त्यामध्ये पुरीचे तुकडे एकत्र करून बीट, गाजर, कांदा, नारळ, कोथिम्बीर, शेवने सजवून द्या.