आपल्याला नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा येतो तेव्हा वेगळेपणा म्हणून दाल फ्राय बनवायला काय हरकत आहे. दाल फ्राय बनवण्याची अगदी सोपी कृती आहे. फोडणीत कच्चा मसाला टाकला की डाळ अगदी खमंग लागते. टोमाटो मुळे छान थोडीशी आंबट लागते. गरम गरम जीरा राईस बरोबर ही डाळ चांगली लागते.
दाल फ्राय बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ५ जणासाठी
साहित्य :
२ वाटी तूरडाळ (शिजलेली)
२ टी स्पून जिरे
३ लवंगा
२” दालचिनी
२ लहान वेलदोडे
१ तमलपत्र
१ टे स्पून तेल
१ टी स्पून तिखट
१/२ टी स्पून हळद
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
१ टे स्पून टोमाटो (बारीक चिरून)
२ हिरवी मिरची (बारीक चिरून)
मीठ चवीनुसार, कोथंबीर
कृती :
एका कढाई मध्ये तेल गरम करून जिरे, वेलदोडे, लवंग, दालचीनी, मिरची, कांदा परता. टोमाटो टाकून शिजलेली डाळ टाका. नंतर मिरची पावडर, हळद, मीठ, कोथंबीर व एक वाटी पाणी टाकून उकळी आणा. ही डाळ जरा घट्टसर छान लागते.