तिळाची चटणी [ Sesame Seeds Chutney ] ही खमंग लागते त्यात चिंच व थोडी साखर टाकल्याने त्याला आंबटगोड अशी एक वेगळीच चव येते. तसेच ही चटणी वर साजूक तूप व तेल घातल्याने ती खूप छान लागते. तीळ हे स्वादाने तिखट, कडवट, मधुर व तुरट असतात.तीळ हे तब्येतीला व केसांसाठी हितावह असतात. तीळ हे पौस्टिक आहेत.
तिळाची चटणी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ८-१० जणासाठी
साहित्य
२ कप तीळ
१/२ कप सुके खोबरे
४ छोटे चमचे लाल तिखट
७-८ लसून पाकळ्या
२ चिंचेचे बुटुक
मीठ व साखर चवी नुसार
कृती
तीळ भाजुन घ्यावे. सुके खोबरे किसून भाजुन ठेवावे. नंतर तीळ, सुके खोबरे, लाल तिखट, लसून, चिंच, मीठ व साखर एकत्र करून कुटून घ्यावे. ताटात वाढल्यावर त्यावर तूप किंवा तेल टाकावे. हे चटणी गरम भाकरी बरोबर किंवा गरम भाता बरोबर छान लागते.