रताळ्याचे गुलाबजाम हे चवीला छान लागतात. हा एक वेगळाच प्रकार आहे. त्यामध्ये पनीर घातल्याने चव पण छान येते. हे उपासाच्या दिवशी स्वीट डीश म्हणून करता येतात.
साहित्य :
गुलाबजाम साठी : १ मध्यम आकाराचे रताळे, १/४ कप पनीर (किसून) १ १/२ टे स्पून साबुदाणा पीठ, थोडे मनुके, मीठ चिमूटभर, तळण्यासाठी तूप
पाकासाठी : १ कप साखर, १/२ कप पाणी, १ टी स्पून वेलदोड्याची पावडर
कृती : प्रथम रताळी उकडून सोलून अगदी मऊ कुस्करावी. त्यामध्ये किसलेले पनीर व टणकपणा येण्यासाठी साबुदाणा पीठ व मीठ घालून चांगले मळून घ्या व त्याचे छोटे छोटे गोळे करून प्रतेक गोळयामध्ये एक-एक मनुका ठेवून परत गोळा बंद करून घ्यावा.
साखर, पाणी व वेलचीपूड एकत्र करून पाक करायला ठेवा. पाक फार घट्ट नसावा.
एका कढई मध्ये तूप गरम करून गोळे गुलाबी रंगावर मंद विस्तवावर तळून घ्या. मग तळलेले गोळे पाकामध्ये घाला. हा पदार्थ चवीला खूप छान लागतो.