शिंगाडयाचे चटपटीत शेंगदाणे हा उपासाच्या दिवशी बनवता येतात. हे चवीला फार चान लागतात. शिगाडे हे पौस्टिक व शक्ती वर्धक आहेत.
साहित्य : १ कप शेंगदाणे, १/४ कप शिंगाडयाचे पीठ, २ टे स्पून ताक (किंवा १ टे स्पून लिंबूरस), मीठ चवीप्रमाणे, १ टी स्पून जिरे पावडर, १ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर, तूप तळण्यासाठी
कृती : शेंगदाणे थोडे ओले करून बाजूला ठेवा. शिंगाडयाचे पीठ, ताक, मीठ, जिरे पावडर, लाल मिरची पावडर एकत्र करून घ्या. नंतर त्यामध्ये शेंगदाणे घोळून घ्या व एका पेपरवर पसरवून २ तास तसेच ठेवा.
कढईमध्ये तूप तापवून थोडे थोडे शेंगदाणे कुरकुरीत होई पर्यत तळून घ्या. हे शेंगदाणे खूप छान लागतात.
Note- See the same recipe in English – Shingada Peetache Chat-Pat Dane