चॉकलेट कॅरामल पुडीग हे पुडीग खूपच छान लागते. घरी छोट्या पार्टी साठी करू शकता. लहान मुलांना हे खूप आवडेल. त्यामध्ये दुध व अंडे आहे. त्यामुळे पौस्टिक तर आहेच व चॉकलेट मुळे चव छान लागते. जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून देता येते.
चॉकलेट कॅरामल पुडीग बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
२ कप दुध
२ अंडी
१ टे स्पून कोको पावडर
१ ब्रेड स्लाईस
३-४ थेंब व्ह्नीला इसेन्स
कॅरामल करण्यासाठी:
१/२ टे स्पून साखर
२ टे स्पून पाणी
कृती:
दुध गरम करून साखर व कोको पावडर विरघळून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये ब्रेड बुडवून कुस्करून घ्या. अंडे फेटून घ्या त्यामध्ये व्ह्नीला इसेन्स मिक्स करून मिश्रण दुधमध्ये मिक्स करून बाजूला ठेवा.
जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी पसरा. विस्तवावर भांडे गरम करायला ठेवून साखर ब्राऊन करून घ्या. त्यामध्ये दुधाचे मिश्रण ओता.
कुकर मध्ये पाणी गरम झाल्यावर मिश्रणाचे भांडे कुकर मध्ये ठेवा व त्यावर स्टेनलेस स्टीलची प्लेट ठेवा. कुकरचे झाकण लावून ५-६ शिट्या काढा. थंड झाल्यावर भांडे काचेच्या खोलगट प्लेट मध्ये उलटे करा. कॅरामल केलेली बाजू वर आली पाहिजे.
थंड झाल्यावर फ्रीज मध्ये २-३ तास ठेवा मग सर्व्ह करा.