पिन्नी लाडू हे पंजाब मध्ये प्रसिद्ध आहेत. गव्हाचे पीठ, डिंक, खोबरे, ड्राय फ्रुट हे तर पौस्टीक आहेच. व तब्येतीलापण चांगले आहेत. हे लाडू इतर वेळी व दिवाळीला सुद्धा करता येतात.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २५-30 लाडू बनतात
साहित्य :
३ कप गव्हाचे पीठ
२ कप पिठी साखर
१/४ कप खायचा डिंक
१ १/२ कप तूप
१/२ टी स्पून जायफळ
५-६ बदाम (थोडे कुटून)
५-६ पिस्ता (कुटून)
१५ किसमिस
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ कप सुके खोबरे (किसून भाजून)
१ टी स्पून खस-खस (भाजून)
१/४ कप खारीक पावडर (भाजून)
कृती : कढई मध्ये १/२ कप तूप गरम करून गव्हाचे पीठ गुलाबी रंगावर भाजून घ्या. डिंक १/२ टी स्पून तुपामध्ये भाजून पूड करून घ्या. नंतर गव्हाचे पीठा मध्ये पिठीसाखर, डिंक, जायफळ, बदाम, पिस्ता, किसमिस, वेलचीपूड , सुके खोबरे, खस-खस, खारीक पावडर मिक्स करून तूप पातळ करून थोडे थोडे पिठात मिक्स करून लाडू वळा.
The English language version of the Wheat Flour Ladoo is published in this – Article
Another version in Marathi of the same recipe is published in this – Article