पास्ता कटलेट हा एक छान वेगळाच पदार्थ आहे. हे कटलेट आपण नाश्त्याला किंवा छोट्या पार्टीला बनवू शकतो पास्ता हा प्रकार लहान मुलांचा अगदी आवडता प्रकार आहे. The English Version of the same Pasta Dish can be seen Here.
साहित्य : २ कप पास्ता (शिजवून), १ लहान कांदा (चिरून), २ चीज क्यूब (किसून), १/४ कप लाल,हिरवी, पिवळी सिमला मिर्च
पांढरा सॉस : २ टे स्पून बटर, २ टे स्पून मैदा, १ कप दुध, १ टी स्पून मिरी पावडर, २ लवंग पावडर, मीठ चवीने
आवरणासाठी : १/४ कप मैदा, १ अंडे (फेटून), ३ ब्रेड स्लाईस (क्रम), तेल कटलेट तळण्यासाठी
कृती : पास्ता शिजवून बाजूला ठेवा.
पांढरा सॉस : कढई मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा दोन-तीन मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू दुध मिक्स करा. मैदा चांगला चार-पाच मिनिट शिजून द्या. पण गुठळी होऊ देऊ नका. मग त्यामध्ये कांदा व शिमला मिर्च घालून पाच मिनिट शिजू द्या. शेवटी मीठ व मिरी पावडर घालून भाजुला ठेवा. नंतर त्यामध्ये शिजवलेला पास्ता, चीज घालून मिक्स करा मग एका प्लेटमध्ये ओतून थोडे थापून घ्या व फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा. नंतर फ्रीज मधून काढून त्याचे शंकरपाळी सारखे तुकडे करा.
आवरणासाठी : त्यासाठी तीन आवरण आहेत. एका प्लेटमध्ये मैदा घ्या. दुसऱ्या प्लेटमध्ये अंडे फेटून घ्या. तिसऱ्या प्लेट मध्ये ब्रेड क्रम घ्या. एक एक पीस घेवून प्रथम मैद्या मध्ये गोळा, मग अंड्यामध्ये घोळा व शेवटी ब्रेड क्रम मध्ये घोळा.
काढई मध्ये तेल गरम करून एक एक पीस ब्राऊन रंगावर तळून घ्या.
टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.