खजूरहा अति पौस्टिक, वीर्यवर्धक व बलवर्धक आहे. खजूर हा शीतल व पचण्यास जड आहे. खजुरा पासून आपल्याला बरेच पदार्थ बनवता येतात. खजुराचा हलवा हा चवीला छान लागतो. For the English version of the same recipe see this – Article.
खजूराचा हलवा
साहित्य :- १ कप खजूर (बारीक तुकडे करून), १ १/२ कप नारळ (खोवलेला), ३/४ कप गुळ (बारीक चिरून), ६-७ काजू (बारीक तुकडे करून), ३ टे स्पून तूप
कृती :- तूप गरम करायला ठेवा. नंतर त्यामध्ये खजूर, नारळ, गुळ घालून मंद विस्तवावर ठेवुन सारखे हलवत रहा. जेव्हा मिश्रण घट्ट होईल तेव्हा विस्तवावरून काढून प्लेट मध्ये काढून काढा व काजूनी डेकोरेट करा.