अंजीर : अंजीर हे फळ ताजे व सुके अशा दोन्ही प्रकारात असते. त्याचे काय काय औषधी गुणधर्म आहेत ते आपण बघुया.
भारता मध्ये काश्मीर, पुणे, नाशिक, खानदेश उत्तर प्रदेश, बंगलोर, सुरत ह्या ठिकाणी जास्त लागवड होते. जास्त करून उष्ण हवामानात त्याची लागवड जास्त होते.
ताज्या अंजीर हे जास्त पोस्टीक असतात. सुक्या अंजीरामध्ये जे आपल्या शरीराला क्षार लागतात ते असतात. तसेच जीवनस्वत पण असतात. अंजीरा मध्ये लोह हा घटक जास्त प्रमाणात असतो व आपले जठर क्रियाशील बनते व आपल्याला चांगली भूक पण लागते. ज्या लोकांना अशक्त पणा आला असेल, थकल्या सारखे वाटत असेल त्यानी रोज दोन तरी अंजीर खावे. सुके अंजीर जरा पचण्यास व चावण्यास जड असतात म्हणून ते थोडा वेळ पाण्यात भिजत घालावे मग खावे.
अंजीर हे नेहमी मोठ्या आकाराचे घ्यावेत. अंजीर हे शीतदायी, गोड, पचनास थोडे जड, पिक्तविकार, रक्त विकार, व वायू दूर करणारे असतात. लहान अंजीर हे ह्याच्या अगदी उलट असतात. कोरडा खोकला झाला असेल तर अंजीर खावे.
अंजीर हे दुधामध्ये उकळून खावे किंवा अंजीराचे सेवन केल्यावर गरम दुध प्यावे. त्यामुळे अंगामध्ये शक्ती येते व रक्त सुद्धा वाढते. अंजीर ख्याण्याने क्षय रोग बरा होतो.
सुक्या अंजीरात लोह, जीवनसत्व “ए” असते, त्यात द्राक्षशर्करा, चुना, सोडीयम पोट्याशीयम असते. लहान मुलांना मलावरोधात व मधुमेहात सुकी अंजीरे खायला द्यावीत.