पपईचे औषधी गुणधर्म बरेच आहेत. खर तर पपई हेच एक औषध आहे असे म्हंटल तर योग्य होईल.
पपईही गोल किंवा लंब गोल अशी असते. ती कच्ची असतांना हिरवी असते व जशीती पिकू लागते ती पिवळसर होऊ लागते. पिकलेल्या पपईचा गर आंब्यासारखा शेंदरी असतो. वॉशिंगटन व बडवानी या पपया खूप स्वदिस्ट असतात. ह्या पपया खूप गोड असतात.
पिकलेल्या पपईच्या तुकड्यांवर थोडे मीठ, मिरे पावडर, व लिंबाचा रस घालून खायला खूप छान लागतात. व पपईला स्वाद पण खूप छान येतो. कच्च्या पपईची भाजी करतात ती चांगली लागते. पण जर अर्धवट पिकलेल्या पपईची भाजी बनवली तर जास्त चांगली लागते. पकलेल्या पपईपासून कोशिम्बीर, चटणी, बनवली जाते. तसेच पपई, टोमाटो, काकडी मिक्स करून ह्याची कोशिम्बीर पण छान लागते. तसेच अर्धवट पिकलेल्या पपईमध्ये साखर घालून शिरा पण चांगला लागतो.
पपईचे औषधी गुण म्हणजे त्याच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते, भूक लागते, आपल्या शरीराची कार्यशक्ती पण वाढते. जेवणातील अरुची वाढते, लहान मुलांना व मोठ्याना ह्याचा खूप उपयोग होते. हृद्यरोगा साठी पपई खाणे अगदी गुणकारी आहे. मुलांना नियमित पपई खाऊ घातल्याने त्याची उंची चांगली वाढते. तसेच आपला आहार पचण्यास मद्दत होते अशी गुणकारी पपई आहे.
कच्ची पपई मधुर, रुचकर, पिक्तनाशक, वातनाशक, कफ व वायू प्रकोप करणारी असते. कच्या पपईमध्ये पेपेन पुष्कळ असते त्याने पचन शक्ती चांगली सुधारते, कारण पेपेन हे पाचक रसाचे काम करते.
अगदी पिकलेली पपई टाकून देण्यापेक्षा ती मऊ कुस्करावी त्याने तोंडावर मालीश करावे. सुकल्यावर तोंड स्वछ धुवावे, आपल्या चेहरा चांगला पुसून चेहऱ्यावर तिळाचे किंवा खोबरेल तेल चोळावे असे एक आठवडा करावे त्याने आपल्या चेहऱ्यावरील मुरूम व त्याचे डाग नाहीसे होतात तसेच आपला चेहरा सुंदर व तेजस्वी होतो. चेहऱ्यावरचा सुरकुत्या, काळपटपणा व मळकट पाणी नाहीसा होतो.
पपईचे अती प्रमाणात सेवन करणे बरोबर नाही. तसेच ज्या स्त्रीयांना मासिक पाळीचा जास्त त्रास होतो व ज्या स्त्रिया गरोदर आहेत, ज्यांची प्रकृती उष्ण आहे त्यानी पपईचे सेवन करू नये कारण ती उष्ण असते.
पपईमध्ये जीवनसत्व “ए “, “बी”, “सी” व “डी” असते. जास्त पिकलेल्या पपईमध्ये जीवनसत्व “सी” अधिक असते.
अशी ही गुणकारी पपई आहे.