सुकटाची खमंग चटणी : सुकटाची चटणी ही वाळवलेल्या छोट्या माश्यान पासून बनवली आहे. सुकटाला काड सुद्धा म्हणतात. ही चटणी खूप चवीस्ट लागते. तसेच बनवायला पण अगदी सोपी आहे. कधी चिकन, मटन करायचा कंटाळा आला तर ही गोलीम ची चटणी बनवा.
साहित्य :
२ कप सुकट
१ १/२ टे स्पून तेल
१ मध्यम कांदा (चिरून)
८-१० लसूण पाकळ्या (ठेचून)
१ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
मीठ चवीने
२ आमसूल
कोथंबीर.
कृती : एका भांड्यात पाणी घेवून त्यामध्ये सुकत १५ मिनिट भिजत ठेवा. नंतर पाणी काढून टाका.
कढई मध्ये तेल गरम करून ठेचलेले लसून घाला व थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये कांदा घालून थोडा परतून घ्या. कांदा पटून झाल्यावर त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ घालून गोलीम घाला व एक मिनिट परतून झाल्यावर त्यामध्ये एक वाटी पाणी घालून कढई वरती झाकण ठेवून थोडे पाणी घालवे व गोलीम शिजवून घ्यावे.
शिजल्यावर आमसुल, कोथंबीर व खोवलेला नारळ घालून मिक्स करावे.
गरम गरम चपाती बरोबर हे गोलीम सर्व्ह करावे.