चौरंगी सँलड : चौरंगी सँलड हे चवीला खूप चान लागते. त्यामध्ये गाजर, मटार, अननस व काकडी वापरलेला आहे त्यामुळे त्याला चौरंगी सँलड हे नाव आहे. हे दिसायला पण छान दिसते. कारण गाजर हे केसरी, मटार हा हिरवा, अननस हा पिवळा व काकडी ही पांढरी आहे त्यामुळे ते रंगीतपण दिसते.
साहित्य : १ कप गाजर (बारीक तुकडे करून), १ कप मटार, १ कप अननस (तुकडे करून), १ कप काकडी (तुकडे करून), १ कप दही, १ १/२ टे स्पून साखर, मिरेपूड, मीठ चवीने.
कृती : गाजर व मटार उकडून घ्या जास्तीचे पाणी काढून टाका, थंड झाल्यावर गाजर, मटार, काकडी, अननसाचे तुकडे मिक्स करून त्यामध्ये दही, मिरेपूड, साखर, मीठ चवीने घालून मिक्स करा. हे सलाड नेहमी थंड सर्व्ह करावे.