झटपट अनारसे : अनारसे हे आपण बहुतेक करून दिवाळीच्या वेळेस करतो. पण अनारसे हे अधिक मासात मुद्दाम बनवले जातात अनारसे हे अधिक मासात बनवून आपल्या जावयाला खायला देतात त्याने आपल्याला पुण्य मिळत असे म्हणतात. हे अनारसे बनवायला अगदी सोपे आहेत व लवकरपण होतात.
बनवण्यसाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: 30 बनतात
साहित्य :
१ किलो ग्राम तांदूळ
७५० ग्राम पिठीसाखर
थोडे दुध
२ टे स्पून तूप
खस-खस
तळण्यासाठी तूप
कृती : तांदूळ तीन दिवस भिजवून पाणी बदलून सावलीत वाळवून बारीक पिठी करा.
त्यात पिठीसाखर, दुध तूप घालून पाच-सहा तास ठेवा.
मग पीठे चांगले एक सारखे करून त्याचे लहान लहान एक सारखे गोळे बनवून घ्या.
एक गोळा घेवून बोटानी हलक्या हातानी पोलपाटावर खस-खस घेवून त्यावरती अनारसे थापून घ्या.
नंतर पसरट कढई किंवा खोलगट तव्यावर तूप गरम करून त्यामध्ये एक एक अनारसा सोडून त्यावरती झाऱ्याने बाजूचे तूपघालत अनारसा तळून घ्यावा म्हणजे अनारसाला छान जाळी पडते.
अनारसा तळून झाल्यावर चाळणीवर उभा करून निथळत ठेवावा म्हणजे जास्तीचे तूप निघून जाईन. अश्या प्रकारे सर्व अनारसे बनवून घ्या.