कुरकुरीत तळलेली मांदेली : मांदेली हे छोटे मासे आहेत. हे मासे चवीला खूप छान लागतात व फ्राय केले की कुरकुरीत लागतात. बनवायला पण सोपे व लवकर होतात. ही डिश साईड डिश म्हणून करता येते.
फ्राईड मांदेली बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: १५ मांदेली
साहित्य :
१५ मांदेली (मासे)
१ टे स्पून लसून (ठेचून)
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
२ टे स्पून व्हेनिगर
२ टे स्पून तांदळाचे पीठ
मीठ चवीने
२ टे स्पून तेल
कृती :
मांदेलीचे (मासा) तोंड कापून त्याचे पंख कापावे व धुवून त्याला मीठ, हळद, लाल मिरची पावडर, व्हेनिगर, लसून, तांदळाचे पीठ लावून घ्या.
तवा गरम करून तव्याला तेल लावून त्यावर मांदेली रचून त्यावर थोडे थोडे तेल सोडून मंद विस्तवावर दोनीही बाजूनी गुलाबी रंगावर फ्राय करा.
The English language version of the same crispy fried Mandeli recipe can be seen in the article – Here.