खमंग वांग्याचे भरीत -२ : खमग वांग्याचे भरीत हे सर्वांना आवडते. ह्या पद्धतीने पंजाबी लोक भरीत बनवतात. हे वांग्याचे भरीत पराठ्या बरोबर सर्व्ह करतात. ह्या पद्धतीने भरीत खमंग लागते. ह्यामध्ये कांदा व टोमाटो भाजून घेतला आहे. त्यामुळे ह्याची चव अगदी वेगळी लागते.
साहित्य : १ मोठे भरताचे वांगे, २ लहान कांदे (बारिक चिरून), १ छोटा टोमाटो (बारीक चिरून), २ हिरव्या मिरच्या, १ टे स्पून आले-लसून पेस्ट, कोथंबीर, मीठ चवीने
फोडणी करता : १ टे स्पून तेल, १/४ टी स्पून हळद, १/४ टी स्पून लाल मिरची पावडर, ५-६ कडीपत्ता पाने
कृती : भरताच्या वांग्याला तेल लावून मंद विस्तवावर भाजून घेवून ते सोलून कुस्करून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कडीपत्ता, कांदा, टोमाटो, हिरवी मिरची, आले-लसून पेस्ट, घालून मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, मीठ, कुस्करलेले वांगे, कोथंबीर घालून दोन मिनिट परतून घ्या.
गरम गरम पराठ्या बरोबर सर्व्ह करा.