कारली : कारल्यामध्ये जीवन सत्व “ए” व्हिटामीन “सी” व लोह असते. कारले हे आपल्या यकृत व रक्तासाठी उपयोगी आहे. तसेच त्यातील फॉसफरस दात, मस्तक व बाकी आपल्या अवयवांसाठी खूपच उपयोगी आहे. ते रक्त शुद्ध करते. पोटातील कृमी नस्ट करते.
कारले जरी कडू असले तरी ते खूप उपयोगी आहे. आपल्या शरीराला कडू रसाची पण गरज आहे. जसे आपण आपल्या आहारात आंबट, गोड, तिखट, तुरट, खारट ह्याचे सेवन करतो त्याच प्रमाणे कडू या रसाची पण आवशक्यता आहे.
तापामध्ये कारल्याची भाजी खावी त्याने आपल्या तोंडाला चव पण येते. व ती आरोग्याला पण चांगली आहे. ज्यांना मधुमेह आहे. त्यांना कारली फायदेशीर आहेत. त्यानी रोज सकाळी कारल्याचा रस घेतल्याने फायदा होतो. आहारामध्ये कारल्याची भाजी ही खूप फायदेशीर आहे.
कारली ही गुणकारी आहेत. ती थंड, वात, रक्त विकार, पित्त, कृमी ह्या विकरानां फायदेशीर आहेत.