हिरव्या मिरचीची भजी : Hirvya Mirchi Chi Bhaji – हिरवी गार मिरची बघीतली की ती घ्यायला फार मोह होतो. व त्याची भजी म्हंटले की चाखण्यासाठी अजूनच मोह होतो. हिरव्या मिरच्याची भजी ही मराठी लोकांची अगदी आवडती भजी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ती खूप लोकप्रिय आहेत. त्यामध्ये मिरचीला व्हेनीगर लावले आहे त्यामुळे त्याची चव फार छान लागते.
साहित्य : १०-१२ हिरव्या मिरच्या (थोड्या मोठ्या व ताज्या), मीठ चवीने, २ टे स्पून व्हेनीगर, तळण्यासाठी तेल
आवरणा साठी : २ कप बेसन, १ टी स्पून लाल मिरची पावडर, १/४ टी स्पून हळद, १/२ टी स्पून हिंग, १ टे स्पून तेल (गरम), मीठ चवीने
कृती : हिरव्या मिरच्या धुवून कोरड्या कराव्यात मग मध्ये एक चीर मारून त्यामध्ये एक चिमुट मीठ व २-३ थेंब व्हेनीगर घालुन १० मिनिट बाजूला ठेवावे.
एका भांड्यात बेसन घेवून त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ, गरम तेल घालून मिक्स करावे. मग त्यामध्ये थोडे पाणी घालून चांगले फेटून घ्यावे. (पाणी घालून फार पांतळ करू नये) थोडे घट्टच असावे.
कढई मध्ये तेल गरम करून एक एक मिरची बेसनाच्या मिश्रणात बुडवून मग गरम तेलात सोडावे. मिरची तेलामध्ये सोडाल तेव्हा विस्तव मोठा ठेवा. नंतर विस्तव मंद करा. व मिरचीची भजी छान कुर-कुरीत तळून घ्या. ही भजी गोडाच्या मेजवानी बरोबर छान लागतात.