भेंडीची भाजी (पंजाबी पद्धतीने) (Bhendichi Bhaji Punjabi Style) पंजाबी पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी अगदी मस्त लागते. ह्या भाजी मध्ये आंबट पणा येण्यासाठी अनारदाणा किंवा आमचूर पावडर वापरलेली आहे. त्यामुळे चव अगदी वेगळीच लागते. ही भाजी गरम गरम पराठ्या बरोबर छान लागते.
साहित्य : २५० ग्राम भेंडी (कवळी), २ मध्यम आकाराचे कांदे (चिरून), १ टे स्पून तूप, १/४ टी स्पून हळद, ३/४ टी स्पून काळी मिरी पावडर किंवा ३/४ टी स्पून लाल मिरची पावडर, ३/४ टी स्पूओम धने-जिरे पावडर, चिमुटभर अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर, मीठ चवीने
कृती : भेंडी धुवून कोरडी करून घ्या. मग त्याच्या लांबट काचर्या करून घ्या.
कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, अनारदाना पावडर, मीठ घालून मिक्स करून मग चिरलेली भेंडी घालावी व परतून घ्यावी. जरा मऊसर शिजली की मग उतरवावी.
टीप : भेंडीची भाजी बनवतांना कढई वर झाकण ठेवू नये त्यामुळे भेंडीच्या भाजीचा रंग हिरवाच रहातो. कांदा घातल्याने जरा भाजीपण वाढते. व चव पण छान येते.