मटकीची गोड्या मसाल्याची उसळ Matkichi Goda Masala Usal: मोड आलेल्या मटकीची उसळ ही चवीला अप्रतीम लागते. ह्या उसळी मध्ये मेथी दाणे व धने घातल्या मुळे चांगला सुगंध येतो, त्यामध्ये गोडा मसाला आहे त्यामुळे खमंग लागते. चिंच-गुळ आहे त्यामुळे आंबट गोड चव येते. जर ही उसळ तुम्हाला थोडी ओली पाहिजे असेल तर पाणी घाला नाहीतर अगदी थोडे पाणी घालून कोरडी पण छान लागते. मुलांना शाळेतील डब्यात देता येते. ही चीन-गुळाची आंबट-गोड मोड आलेल्या मटकीची उसळ महाराष्ट्रात मराठी लोकांना फार आवडते व महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध पण आहे. आपण पण जरूर करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल.
The English version of the same Makti preparaation can be seen in the article – Here
साहित्य : २ कप मोडे आलेली मटकी, १ मध्यम आकाराचा कांदा, ७-८ लसून पाकळ्या, १ टी स्पून गोडा मसाला, १ टी स्पून लाल मिरची पावडर, १ टे स्पून चिंच कोळ, १ १/२ टे स्पून गुळ, १ टे स्पून ओले खोबरे, १ टे स्पून शेंगदाणे, १ टे स्पून कोथंबीर, मीठ चवीने
फोडणी साठी : १ टे स्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून हळद, १/४ टी स्पून हिंग, ८-१० मेथी दाणे, ५-६ धने, ७-८ कडीपत्ता
कृती : प्रथम मोड आलेल्या मटकी व शेंगदाणे व थोडेसे पाणी घालून कुकर मध्ये एक शिट्टी काढून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, लसून, मेथी दाणे, धने, कडीपत्ता घालून मग कांदा घाला व थोडा परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ, उकडलेली मटकी व एक कप पाणी घालून मिक्स करून ५-७ मिनिटे मंद विस्तवावर शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये गोडा मसाला, चिंच, गुळ घालून मिक्स करून एक चांगली उकळी येवु द्या. मग त्यामध्ये ओल्यानारळाचे खोबरे, कोथंबीर घालून मग चपाती बरोबर सर्व्ह करा.
टीप : मोड आलेल्या मटकीच्या उसळी मध्ये मेथी दाणे व धने घातल्याने उसळ चांगली चवीस्ट लागते.