बदाम सफरचंद खीर : ही खीर फारच चवीस्ट लागते. ही एक महाराष्ट्रीयन स्वीट डिश आहे. ह्यामध्ये मी खवा वापरलेला आहे त्यामुळे त्याची छान वेगळीच चव येते. सफरचंदाचा जूस व नारळ पेस्ट घातल्याने पण त्याची टेस्ट अप्रतीम येते. ही खीर सणाला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवायला उत्तम आहे. तसेच डेझर्ट म्हणून सुद्धा करता येते.
The English version language recipe of the same Kheer preparation can be seen in the article – Here
साहीत्य : १ लिटर दुध, ५० ग्राम खवा , १०० ग्राम साखर १/२ टी स्पून विलायची पावडर, २-३ काड्या केसर, १ कप सफरचंदाचा घट्ट जुस, ५० ग्राम फ्रेश क्रीम, (५० ग्राम बदाम, ५० ग्राम खोवलेला नारळ पेस्ट करून)
कृती : बदामाची साले काढून तिरके तुकडे करा. १/२ लिटर दुधामध्ये खवा, बदाम-नारळ पेस्ट टाकून ५-७ मिनिटे गरम करून घ्या. साखर, सफरचंद जूस, विलायची पावडर, केसर, टाकून ५-७ मिनिटे गरम करा. नंतर त्यामध्ये १/२ लिटर दुध, फ्रेश क्रीम व विलायची पावडर टाकून ५ मिनिटे गरम करून घ्या. ही खीर गरम किंवा थंड पण चांगली लागते.
टीप: सफरचंदाची साले काढून मग मिक्सर मधून बारीक करा. नारळ सुद्धा मिक्सर मधून काढा म्हणजे खीर चांगली मिळून येते. व चवीस्ट लागते.