बीटरूट हलवा : बीटरूट म्हंटले की आपल्याला नेहमी सलाड डोळ्यासमोर येते. पण बीटरूटचा हलवा करून बघा खूप छान लागतो व तो पौस्टिक पण आहे. तसेच त्याचा रंग पण सुंदर दिसतो. बीटरूटच्या हळव्या मध्ये खवा घातल्याने चव अगदी निराळीच येते. स्वीट डिश म्हणून किंवा डेझर्ट म्हणून करता येते. मुलांना साठी हा हलवा चांगला आहे कारण की ते बीटरूट खायचा कंटाळा करतात.
The English version of the Beetroot Halwa can be seen – Here
साहीत्य : २ मोठी बीटरूट (धुऊन, साले काढून किसून), १०० ग्राम खवा, २ टेबल स्पून तूप, १०-१२ काजू (तुकडे करून) थोडे किसमिस, १/४ कप दुध, १/२ कप साखर
कृती : कढईमध्ये तूप गरम करून किसलेले बीटरूट २-३ मिनिटे फ्राय करून घ्या. दुध गरम करून घ्या. नंतर बीटरूट मध्ये दुध व साखर टाकून ५-७ मिनिटे गरम करून घ्या मग त्यामध्ये खवा, काजू, किसमिस घालून मिक्स करा.
गरम गरम सर्व्ह करा.
टीप : बीटरूट ताजे घ्यावेत म्हणजे हलवा छान होतो.