गाजर रोल्स : गाजर रोल्स ही एक स्वीट डिश आहे. आपण नेहमी गाजराचा हलवा किंवा खीर बनवतो हा एक वेगळीच पदार्थ आहे. जरूर बनवून पहा सगळ्यांना आवडेल. ह्यासाठी चांगली ताजी कोवळी गाजरे घ्या. गाजर, पनीर व खवा हे कॉमबीनेशन खूप छान लागते. आपल्याकडे जेवायला पाहुणे येणार असतील तर ही डिश चांगली आहे व चांदी वर्ख,लावल्यामुले टेबलावर डिश दिसायला पण सुंदर दिसते.
साहित्य : ५०० ग्राम गाजर, २५० गरम खवा, १०० ग्राम पनीर, २५० ग्राम साखर, ५-६ बदाम (तुकडे करून), १ टेबल स्पून कॉर्नफ्लोर, १ टी स्पून वेलची पावडर चांदी वर्ख, तूप तळण्यासाठी
कृती : गाजर साफ करून धुऊन मधला भाग खरडून पोकळ करून २-३ मिनिटे उकडून घ्या. नंतर साखरेचा एक तारी पाक करून शिजलेले गाजर ५-१० मिनिटे मुरत ठेवा.
पनीर, खवा, वेलचीपूड व बदाम तुकडे एकत्र करून मिश्रण बनवून थोडे थोडे गाजरच्या पोकळ भागा मध्ये भरून कॉर्नफ्लोरची पेस्ट लाऊन बंद करून घ्या.
कढाई मध्ये तूप गरम करून गाजरचे तुकडे तळून घ्या. वरून चांदीचा वर्ख लावून डेकोरेशन करा.